डॉ. हेडगेवार यांनी दिलेल्या शाखा तंत्रातून सर्वस्वाचे समर्पण देणारे कार्यकर्ते घडले. तेल्हाऱ्यात “विदर्भ हुंकार”च्या विमोचन समारंभात विभाग संघचालक नरेंद्रजी देशपांडे यांचे प्रतिपादन.
डॉ. हेडगेवार यांनी दिलेल्या शाखा तंत्रातून सर्वस्वाचे समर्पण देणारे कार्यकर्ते घडले. तेल्हाऱ्यात "विदर्भ हुंकार"च्या विमोचन समारंभात विभाग संघचालक नरेंद्रजी देशपांडे यांचे प्रतिपादन.
डॉ. हेडगेवार यांनी दिलेल्या शाखा तंत्रातून सर्वस्वाचे समर्पण देणारे कार्यकर्ते घडले. तेल्हाऱ्यात “विदर्भ हुंकार”च्या विमोचन समारंभात विभाग संघचालक नरेंद्रजी देशपांडे यांचे प्रतिपादन.

सर्वदूर संस्कृती, धर्म विचारांचा ऱ्हास होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जातआहे. मोबाईल पायी मानसिक संतुलन बिघडले आहे, समाजात फूट पाडणारे विचार घराघरात घडत आहेत. अशा परिस्थितीत समाज प्रबोधन, वाचन संस्कृती वाढणे गरजेचे असून नव्या पिढीने हे जाणले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी सर्वस्वाचे समर्पण देणारी माणसे शाखा तंत्रातून निर्माण केली असे प्रतिपादन तेल्हारा येथे शनिवार दि.१० जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला विभाग प्रचार विभागाच्या वतीने आयोजित मासिक जागरण पत्रिका “विदर्भ हुंकार” च्या शताब्दी वर्ष विशेषांक समर्पणाचा शतकोत्सव या विशेषांकाचे प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.

आपल्या प्रमुख उदबोधनातून त्यांनी पंचपरिवर्तन (कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व आधारित जीवन, नागरी शिष्टाचार) या गोष्टी आचरण आज आणण्याची गरज प्रतिपादन केली.
तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालयात आयोजित प्रकाशन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाल ढोले, प्रमुख वक्ते अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, अकोला जिल्हा संघचालक मोहनराव आसरकर, तालुका संघचालक डॉ. माधवराव बनकर ,नगर संघचालक गजाननराव मुंजे, ज्येष्ठ संघ कार्यकर्ते वासुदेवराव नळकांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी प्राचार्य गोपाल ढोले यांनी संघान राष्ट्र निर्माणात मोलाची कामगिरी बजावल्याचे सांगून वनवासी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, विकासात्मक व रचनात्मक क्षेत्रात संघाचे काम प्रशंसानीय आहे. राष्ट्रनिर्माणासाठी व्यक्ती निर्माण, वसुधैव कुटुंबकम विचारातूनच परिवर्तन घडेल. असा विश्वास व्यक्त केला.

प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अकोला जिल्हा प्रचार- प्रसार प्रमुख अमित काकड यांनी केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश शिंगणारे यांचा विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सर्वश्री गणेश बावणे, अजय भेंडे, गजानन चंदन, गजानन अवचार, आनंद भुजबले, धनंजय कुळकर्णी , रामदास घावट , ऋषिकेश नळकांडे, उत्तमराव नळकांडे, भवानी प्रताप, मंगेश घोंगे यांच्यासह निमंत्रित नागरिक, पत्रकार, संघाचे दायित्वधारी अधिकारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी खंड कार्यवाह हरिदास चुंगडे यांनी वैयक्तिक गीत गायीले. चैतन्य नळकांडे यांनी गायिलेल्या वंदे मातरम गायनाने विदर्भ हुंकार प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.