क्रीडा

तेल्हारा येथे मेरा युवा भारत केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धचा समारोप.विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चा पुढाकार.

तेल्हारा येथे मेरा युवा भारत केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धचा समारोप.विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चा पुढाकार.

तेल्हारा येथे मेरा युवा भारत केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धचा समारोप.विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चा पुढाकार.

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, मेरा युवा भारत केंद्र, अकोला यांच्या संयुक विद्यमानाने विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी यांच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी महेश सिंग शेखावत यांच्या मार्गदर्शनात मंडळ अध्यक्ष प्रदीप राऊत यांच्या नेतृत्वात दिनांक ५ जानेवारी २०२६ ते ६ जानेवारी २०२६ रोजी क्रीडा संकुल तेल्हारा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेची सुरुवात युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस कॉन्स्टेबल वैष्णवी काळे आणि दामिनी पथक च्या शामल येडे यांच्या हस्ते प्राध्यापक आशिष वानखडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले. या वेळी मंचकावर नगरसेवक सतीश जयस्वाल, रुपेश चव्हाण, एस के अकॅडमी चे संचालक सचिन गव्हाळे, उज्वला उजवणे, शामल पवार,राठोड सर,व क्रीडा संकुल केअर टेकर श्रीकृष्ण वायकर, प्रदीप राजुस्कर, शिवनेरी अकॅडमी सतीश आमटे, प्रथमेश तारमेकवार यांची उपस्तिती होती.  या कार्यकमा मध्ये सचिन गव्हाळे व आशिष वानखेडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप राऊत यांनी करून मेरा युवा भारत केंद्र आणि मंडाळाचे यांचे कार्य विषद करून स्पर्धेची नियम व अटी संबंधी माहिती दिली. युवक-युवतींच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्याकरिता युवकांसाठी क्रीडा गुणांसाठी व्यासपीठ मेरा युवा भारत केंद्राच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सांखिक आणि वैयक्तिक खेळ घेण्यात आले मुलांन साठी कबड्डी तर मुलीनं साठी खो खो तर मुलं-मुली करिता १०० मीटर धावणे व गोळा फेक स्पर्धा घेण्यात आल्या.

युवक कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चंपामाता क्रीडा मंडळ माळेगाव, द्वितीय क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ, तेल्हारा, तर तृतीय डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा, युवती खो-खो प्रथम क्रमांक टारगेट फिजिकल अकॅडमी दानापुर संघ, द्वितीय क्रमांक ग्राउंड प्रॅक्टिस ग्रुप तेल्हारा, तृतीय क्रमांक गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा, वैयक्तिक खेळामध्ये मुलं गोळा फेक प्रथम क्रमांक सूरज भोजने, द्वितीय क्रमांक पवन राऊत, तृतीय क्रमांक बंटी गायकवाड, युवती गोळा फेक प्रथम क्रमांक वैष्णवी चव्हाण, द्वितीय क्रमांक माधुरी बघन, तृतीय क्रमांक आचल खंडारे, आणि १०० मिटर धावणे स्पर्धेत मुलांन मधून प्रथम क्रमांक गौरव मिसाळ, द्वितीय क्रमांक रोहन गवई, तृतीय क्रमांक गणेश रेडे,१०० मी धावणे रनिंग मुलीनं मधून प्रथम क्रमांक वैष्णवी चव्हाण, द्वितीय क्रमांक गायत्री तायडे, तृतीय क्रमांक इशिका कनोजी या सर्व युवक युवती खेळाडूंना पारितोषिक सुवर्णपदक, रोप्यपदक, कास्यपदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप राजुस्कर यांनी तर आभार प्रदर्शन विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंटी राऊत यांनी मानले. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सुदर्शन ठाकूर क्रीडा संकुल केअरटेकर राजे संभाजी अकॅडमी, लक्ष अकॅडमी, एस के अकैडमी, शिवनेरी फिजिकल अकॅडमी, टारगेट फिजिकल अकॅडमी दानापूर, पोलीस बांधव मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!