आपला जिल्हा अकोला

अकोला जिल्हा मराठा महासंघाचे वतीने वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प. 

अकोला जिल्हा मराठा महासंघाचे वतीने वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प. 

अकोला जिल्हा मराठा महासंघाचे वतीने वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखा, अकोला च्या वतीने शिवापूर, अकोला येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी आंबा, जांभूळ, कडुलिंब, वड, पिंपळ, गुलमोहर, सप्तपर्णी, करंज, बहावा ,बेल, चिंच, उंबर आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष निळोबा ढोरे यांनी झाडाचे महत्व विशद करताना झाडे आपल्याला प्राणवायू (ऑक्सिजन ) देतात ,हवेतील प्रदूषण कमी करतात. पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवतात, असे झाडांचे अनेक प्रकारचे फायदे आहेत म्हणून झाडे लावणे व ते जगविने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे याप्रसंगी सांगितले तसेच याप्रसंगी सेवानिवृत्त उपअधीक्षक केशवराव पातोंड व मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे यांनी सुद्धा वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले.

यावेळी भारत माता की जय, झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरणाचे – संवर्धन करूया ! अशा घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमास नगरसेवक गणेश अंधारे, शंकरराव लंगोटे, विनोद मापारी, विजुभाऊ इंगळे, मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे, अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश ठाकरे ,अकोला जिल्हाध्यक्ष निळोबा ढोरे, उपाध्यक्ष, सतीश सुर्वे, महानगर अध्यक्ष मुरलीभाऊ सटाले ,युवा कार्याध्यक्ष आदेश अंधारे ,एड. अमोल सूर्यवंशी, प्रा. स्नेहा पातोंड , श्रीमती सविता ताई शेळके , अमित देशमुख, गोपाळराव गावंडे, प्रतीक देशमुख, गजानन डोईफोडे, अनिकेत देशमुख ,गणेशराव सारसे , वैकुंठराव ढोरे ,अरुण पाटील, अंबादास ढोरे , पद्माकर पातोंड, नारायणराव ढोरे, भीमराव वानखडे , अनिल शिरसाट , रमेश जंजाळ, रमेश जंजाळ आदी मान्यवरासह बहुसंख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रम यशस्वीते करिता मदन वानखडे, पंजाबराव वानखडे ,प्रतीक ढोरे ,अवी पातोंड, बंडू ढोरे, पंजाबराव ढोरे, बाबाराव डोंगरे , ज्ञानेश्वर गावंडे , दिनकर नळकांडे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष निळोबा ढोरे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सतीश सुर्वे यांनी केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!