आपला जिल्हाआपला जिल्हा अकोलाआपला जिल्हा बुलढाणा

राजु पाटील ठाकरे, वडगांव वान तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा कबड्डी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू, संघ नायक यांचे निधन., भावपूर्ण श्रद्धांजली. 

राजु पाटील ठाकरे, वडगांव वान तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा कबड्डी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू, संघ नायक यांचे निधन., भावपूर्ण श्रद्धांजली. 

राजु पाटील ठाकरे, वडगांव वान तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा कबड्डी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू, संघ नायक यांचे निधन., भावपूर्ण श्रद्धांजली.

राजु पाटील ठाकरे, वडगांव वान तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा कबड्डी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू, संघ नायक.,शेतकरी कामगार पक्षाचा पाया लाभलेले…पुढे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर चे संचालक, श्री दत्तात्रय अर्बन मल्टिस्टेट शाखा वरवट संचालक यांच्या निधनाची बातमी समजली अचानक जाणे मनाला चटका लावणारे…,अमरावती येथे हृदयाचे उपचारा दरम्यान दि 28 मार्च 2026 च्या रात्री 2 वाजता निधन झाले. मुळ गाव वडगाव वान येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार पंचक्रोशीतील जनसमुदाय,सामाजिक, राजकीय,क्रीडा क्षेत्रातील सर्वांसाठी शोकाकुल…🙏

आम्ही तेल्हारा तालुक्यातील दर्यावर्ती कबड्डी संघाचे खेळाडू म्हणून व शेतकरी कामगार पक्षाचे वासंतीताई गावंडे यांचे प्रचारक,सोयरे म्हणून परिचित…

आमच्या सदैव आठवणीतील राजु पाटील यांच्या सोबतचा सामना…सन अंदाजे 1990-91 राजु पाटील यांचा कबड्डी क्षेत्रात उमेदीचा काळ तर आमची नुकतीच दहावी होवून सुरूवातीचा काळ… दर्यावर्ती कबड्डी संघ व वडगाव वान च्या संघाच्या लढती नेहमीच तुल्यबळ…वडगाव वान संघात राजु पाटील, भास्कर भाऊ, विष्णू भाऊ मालोकार, रामदास मिसाळ भाऊ, ढगे भाऊ,किसनराव अंभोरे, राऊत अशा धष्टपुष्ट, चाणक्य, बलाढ्य एकशे एक खेळाडू चा भरणा…परिसरात वडगाव वान, वडगाव रोठे, वानखेड, जस्तगाव, उकळी बाजार,बु, बेलखेड दर्यावर्ती जयहिंद,पिंपरी सोबत लढत म्हणजे त्याकाळी मोठे दिव्य होते…या संघाच्या आमच्या दर्यावर्ती बेलखेड संघा सोबत लढती प्रेक्षणीय होत… आमच्या आठवणीतील चांगलवाडी येथील आत्मशक्ती संघाचे खुले कबड्डी सामने…या मध्ये आम्ही मुख्य दर्यावर्ती संघ या ठिकाणी नसल्याने आम्ही नवखे खेळाडू म्हणून सत्यशील प्र सावरकर, श्रीकृष्ण खुमकर,वसंता लोळे, रामेश्वर कुयटे,गणेश कुयटे, गणेश लोळे,गणेश मामनकार, गजानन माळोकार सायकल ने डाबर -रायखेड गाळ रस्ता मार्गे गेलो… पहिला सामना गावातील संघा सोबत झाला आम्ही विजयी झालो… दुसरा सामना बलाढ्य संघ वानखेड सोबत झाला…संघात वानखेड चे एकनाथ भाऊ घुले, काटे भाऊ, राजनकर, भोपळे, पाखरे… सामन्याची पहिली चढाई उत्कृष्ट रेडर एकनाथ भाऊ घुले यांनी मारली आणि आम्ही त्यांची यशस्वी पकड केली या मध्ये आमचा समोरील दाताला इजा झाली पण पकड यशस्वी झाली आजही ती पकड दाताचा बदललेला रंग आठवण करून देते… पुढे आम्ही मागे न सरता वानखेड संघावर लोन मारले व विजयी ठरून उपस्थित जनसमुदाय व चांगलवाडी गावातील जनतेच्या डोळ्याचे पारणे फेडले, समालोचन करणारे गजानन पाटील कडू, शिवणकर यांनी संघाचे भरभरून कौतुक केले. 

त्यानंतर सेमी फायनलमध्ये वडगाव वान च्या संघासोबत लढत ठरली… आमच्या दर्यावर्ती संघाचे आत्मबल वानखेड संघाला हरविल्याने वाढले होते… वडगाव वान सोबत लढत सुरू झाली… पहिली चढाई राजु पाटील यांनी केली राजु पाटील यांना पुढे हात करून चढाई करण्याची सवय होती… आम्ही त्यांच्या हाताला पकड केली पुर्ण संघा च्या सांघिक पकडीत राजु पाटील पहिल्याच पकड मध्ये आम्ही बाद करून सर्वांना धक्का दिला…सामना रंगात आला…परंतु नंतर पुढे पुढे या बलाढ्य संघा पुढे आमच्या नवख्या संघाचा टिकाव लागला नाही आम्ही सन्मानाने चार गुणांनी हरलो… व तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलो परंतु आजही आठवते आमच्या संघाचे तोंड भरून कौतुक राजु पाटील यांनी केले. पुढे जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या केलेल्या पकडीचे व अटीतटीच्या सामन्यांचे कौतुकच केलेव सदैव मार्गदर्शन केले.. राजु भाऊ तुमची आठवण व सामना सदैव आठवणीतील ठेवा राहीला…काळवेळ सांगता येत नाही…जड अंत करणाने भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏🙏

✍️सत्यशील प्र सावरकर,दर्यावर्ती कबड्डी संघ बेलखेड,मा उपसरपंच बेलखेड,पत्रकार तेल्हारा तालुका

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!