आपला जिल्हा अकोला

तेल्हारा आय टी आय संस्था स्तरीय प्रवेश प्रकियेला सुरुवात – प्राचार्य डॉ.आर.ई.शेळके (औ.प्र.संस्था तेल्हारा)

तेल्हारा आय टी आय संस्था स्तरीय प्रवेश प्रकियेला सुरुवात - प्राचार्य डॉ.आर.ई.शेळके (औ.प्र.संस्था तेल्हारा)

तेल्हारा आय टी आय संस्था स्तरीय प्रवेश प्रकियेला सुरुवात – प्राचार्य डॉ.आर.ई.शेळके (औ.प्र.संस्था तेल्हारा)

विष्णुदास महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे सत्र 2026-27 संस्था स्तरीय समुपदेशन फेरी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असुन ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करणे सुरु आहे अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ आर.ई.शेळके यांनी दिली आहे.

दिवसेदिवस औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडे प्रवेश घेण्याचा विद्यार्थीचा कल वाढत असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आय टी आय च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. तसेच उच्च शिक्षणासाठी साठी सुद्धा मोठयाप्रमाणावर संधी उपलब्ध असून पॉलीटेकनिक च्या थेट व्दितीय वर्षाला आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो . आय टी आय च्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते.
यावर्षी विष्णुदास महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे तारतंत्रि , यांत्रिक मोटार गाडी, ड्रेस मेकिंग, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, वेल्डर ,या ट्रेड साठी प्रवेश इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा
तसेच प्रवेश संदर्भात काही अडचण असल्यास माहिती व समुपदेशन करीता दररोज सकाळी १०ते ५ वेळेत संस्थेतील समुपदेशन केंद्रात भेट द्यावी.आय टी आय प्रवेश प्रक्रिया चवथी प्रवेश फेरी पुर्ण झाली असुन अंतिम टप्यातील संस्थास्तरीय स्पॉट राऊंड फेरी साठी नोंदणी करणे सुरु झाले आहे ज्या विद्यार्थीना 4 फेरी पर्यंत प्रवेश मिळाला नाही व नव्याने अर्ज भरलेले सर्व उमेदवार या फेरी साठी पात्र असुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करावी.समुपदेशन फेरी करीता दि 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान अर्जदाराने स्वतःच्या लॉगिन मधुन नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहिती करिता संस्थेला भेट द्यावी.

तेल्हारा आय टी आय येथे उपलब्ध अभ्यासक्रम
येथे दोनवर्षीय अभ्यासक्रम साठी तारतंत्री ,यांत्रिक मोटार गाडी व एक वर्ष अभ्यासक्रम साठी ड्रेस मेकिंग ,फ्रुट अँड व्हिजिटेबल प्रोसेसिंग , वेल्डर या ट्रेड चा समावेश आहे.

कौशल्य सह स्वरोजगार शिक्षण सध्या काळाची गरज आहे हेच बघून दिवसेंदिवस आय टी आय कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आय टी आय मधील विविध ट्रेड ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया मध्ये सहभाग घ्यावा. आय टी आय च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत.
प्राचार्य आर. ई.शेळके
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!