श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य हे होते तर अतिथी म्हणून माजी प्राचार्य अण्णा साहेब ढोले सर, आजिव सदस्य बाळासाहेब पाटील, आजिव सदस्य रमेशभाऊ कोकाटे आजिव सदस्य सुधीर बापू देशमुख, गजानन पाटील साहेब, उद्धवराव विखे सर शाळा तपासणी अधिकारी, डॉ अनिल मल्ल, डॉ गिता मल्ल, डॉ अंनत वैराळे, एस आर विखे,एस बी पिवाल, जी आर भारसाकळे, एस.जी कराळे, ओंकारराव फाटकर, जितेंद्र देशमुख,सौ प्रेरणाताई कराळे मॅडम, सौ विद्या देशमुख, अनवर शहा, वासुदेव खुमकर, मुकुंद कडू, भाऊदेव भटकर, मुख्याध्यापक शांतीकुमार सावरकर, सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी, विजय दहे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सुरेशदादा खोटरे साहेब यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शांती हॉस्पिटल तेल्हारा यांच्या कडून शाळेतील विद्यार्थ्यांना आरो पाणी पुरवठा दिला तसेच शाळेतील अद्यावत ग्रंथालयात प्रेरणा इमर्जन्सी हॉस्पिटल तेल्हारा यांच्या कडून वजन काटा देण्यात आला. सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते. शाळेतील माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष पदी प्राचार्य अण्णासाहेब ढोले सर माजी विद्यार्थी यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी बाळासाहेब पाटील साहेब, रमेशभाऊ कोकाटे साहेब यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष व सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे प्रास्ताविक शांतीकुमार सावरकर मुख्याध्यापक यांनी केले आहे. शहरात प्रभात फेरी काढण्यात आली आहे यावेळी लेझीम पथक, हरित सेना पथक स्काऊट गाईड, एन सी सी पथक बँड पथक सहभागी झाले होते.
कार्यक्रम चे सुञसंचालन सौ शर्वरी हिंगणकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रूपचंद गाढवे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.