तेल्हारा नगर परिषदेच्या वतीने महिला दिन उत्साहाने साजरा.
कतृत्वान महिला सन्मानित.
तेल्हारा – दि.
तेल्हारा नगर परिषद डे. एन. यु. एल. एम. विभाग स्थापीत फुलपाखरू शहरस्तर संघ तेल्हारा च्या वतीने दिनांक 11 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता जागतिक महिला दिन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील कत्वृत्वान महिलांना गौरव चिन्ह शाल पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधत नगर परिषद येथे डे एन यु एल एम योजने अंतर्गत स्थापित महिला बचत गटातील महिला साठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणात आले होते यावेळी नगर परिषद चे लेखा अधिकारी नागेश भाकरे , पार्श्वगायकगीत-संगीतकार अभिनेता व निर्माता-दिग्दर्शक मुकुंद कुमार नितोणे,
विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ दर्यापूर चे स्वनिल डुकरे, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया निलेश अबगड, शाखा व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया दिनेश गिरी, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र रविद्र गोधंडे, सहा शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल ऑफ इंडिया, सौ संगीता देशमुख फुलपाखरू च्या अध्यक्ष, रेखा चव्हाण सचिव,शंतनू वक्ते सहा प्रकल्प अधिकारी ,माधुरी सुशिर CLC व्यवस्थापक ,मीना बासोडे ,वंदना देशमुख ,वर्षा पवार ,संगीता परघरमोर ,वैशाली भटकर,अनिता वाडेकर समुदाय संसाधन व्यक्ती तसेच मोठा संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमा चे संचालन माधुरी सुशिर यांनी तर प्रास्ताविक शंतनू वक्ते यांनी केले आभार मीना बासोडे यांनी माडले.
कार्यक्रम मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. दरम्यान स्पर्धेत विजेत्यांना शिल्ड देवून गौरवण्यात आले त्यामध्ये उत्कृष्ट बचत गट पंचसूत्रीचे काटेकोर पालन करणारे गट या प्रकारात प्रथम जय दुर्गा महिला बचत गट, द्वितीय कुलस्वामिनी महिला बचत गट ,तृतीय हरिओम महिला बचत गट यांना तर
उत्कृष्ट बुक किपिंग गटाचे रेकार्ड बुक मध्ये नियमित सर्व नोंदी घेतल्या जातात तसेच वैयक्तिक सदस्यांच्या वही वर अद्यावत नोंदी घेणे आवश्यक आहे या प्रकारात प्रथम यशस्वी महिला बचत गट, द्वितीय साईबाबा महिला बचत गट, तृतीय श्रम साफल्य महिला बचत गट तसेच

उत्कृष्ट ग्रुप लीडर ज्या महिलेचा गटावर चांगली मजबूत पकड असून गटातील सर्व आर्थिक व सामाजिक व्यवहार चोख बजावले जातात, सामाजिक विषयावर काम केल्या जाते, गटातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी उद्योग बाबत माहिती देण्यासाठी सक्षम पणे काम करत आहे या प्रकारात प्रथम वनमाला शिंगणे, द्वितीय जया पोहरकार, तृतीय सुनिता कुटाळे यांना गौरवण्यात आले. ,गीत गायक स्पर्धा या प्रकारात प्रथम मीना बासोडे , द्वितीय शालिनी बोदडे, तृतीय नेतल शर्मा तर उत्कृष्ट महिला बचत गट विक्री स्टोल या प्रकारात प्रथम माई महिला बचत गट, द्वितीय नीलकंठ महिला बचत गट , तृतीय पुष्कर्णा महिला बचत गट. संगीत खुर्ची स्पर्धा या प्रकारात प्रथम अश्विनी शिंगणे,द्वितीय शोभा इंगळे, तृतीय साधना माळोकार. शब्दा वरून गाणे म्हणने स्पर्धा : या प्रकारात प्रथम माधुरी सुईवाल, द्वितीय मोनिका बाभूळकर, तृतीय पुष्पा कांबळे यांचे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम अधिकारी शंतनू वक्ते यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये डे एन यु एल एम योजने अंतर्गत 139 गटांना दोन कोटी नव्वद लाख रु कर्ज वितरीत करण्यात आले तर 78 स्वयं रोजगार लाभार्थी यांना 72 लाख रु कर्ज वाटप करण्यात आले तसेच पी एम स्वनिधी योजने मध्ये 881 लाभार्थी ना एक कोटी चाळीस लाख रु कर्ज वाटप करण्यात आले आहे एकूण पाच कोटी दोन लाख रु तेल्हारा शहरातील लाभार्थी यांना योजने अंतगर्त कर्ज वाटप केल्या बद्दल सर्व शाखा व्यवस्थापक यांचे आभार मानले व सदर योजना मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आल्याचे सांगितले.