मराठा सेवा संघ अकोला द्वारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन.,गुणवंतांनी नावे नोंदवावी.
मराठा सेवा संघ अकोला द्वारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन.,गुणवंतांनी नावे नोंदवावी.
मराठा सेवा संघ अकोला द्वारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन.,गुणवंतांनी नावे नोंदवावी.

अकोला- मराठा सेवा संघ स्थापना दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील सन २०२६ मधील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक २९ ऑगस्ट २०२६ शनिवार ला दुपारी ३.०० वाजत”जिजाऊ सांस्कृतिक भवन”मराठा सेवा संघ कार्यालय, जुने आर.टी.ओ. ऑफिस जवळ,अकोला येथ आयोजित केला आहे.
या सत्कार सोहळ्यात दहावी मध्ये 90% वा अधिक गुण ,बारावी मध्ये 85 टक्के वा अधिक गुण, नीट मध्ये ५०० वा अधिक गुण, सीईटी मध्ये 90 टक्के वा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या सकल मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
सदर सत्कार सोहळ्यात अस्पायर चे संचालक शिवश्री सचिन बुरघाटे सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे व विद्यार्थ्यांनी आपली नावे व गुणपत्रिका खालील दिलेल्या पत्त्यावर अथवा व्हाट्सअप क्रमांकावर दिनांक 25 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवावी असे नम्र आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हाट्सअप क्रमांक – ९४ २१ ८९ ५० ९९ हा असून कार्यालयाचा पत्ता जिजाऊ सांस्कृतिक भवन मराठा सेवा संघ कार्यालय जुने आरटीओ ऑफिस जवळ अकोला हा आहे.
सदर सत्कार समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत विविध समित्या गठीत करण्यात आल्या त्यामध्ये नियोजन समिती, प्रमुख पाहुणे निवड व निमंत्रण समिती, गुणवंत विद्यार्थी नोंदणी समिती, पुरस्कार वितरण समिती, अल्पोपहार व्यवस्था समिती, कार्यक्रम सूत्रसंचालन, स्टेज व हॉल बैठक व्यवस्था समिती चा समावेश आहे.
या समिती मध्ये खालील पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली .
अँड अनिल लव्हाळे, डॉ संदीप चव्हाण, अमोल पटोकार, किरण देशमुख, प्रा. निलेश भुईभार, अक्षय लहाने, अविनाश गावंडे, जयदीप सोनखासकर,प्रवीण चोपडे, संजय इंगळे ,भागवत टेकाडे, संदीप निर्मळ ,अतुल अंधारे, पंकज जायले, आनंद पाटील सुकळीकर, अंजलीताई ठाकरे , अँड .स्नेहाताई लव्हाळे,आशाताई अंधारे, सोयरा अंधारे, आदींचा समावेश आहे.
सदर सत्कार समारंभ जिल्हाध्यक्ष डॉ.रणजीत कोरडे, जेष्ठ मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे , केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकराव पटोकार, प्रदेश संघटक प्राचार्य प्रशांत जानोळकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा प्रदीपराव चोरे, कार्याध्यक्ष किशोर हिंगणे, विठ्ठलराव गाडे,सुनील जानोरकर,संतोष भोरे, उपाध्यक्ष अरुणराव गावंडे, डॉ. सीमाताई तायडे, इंदुताई देशमुख, डॉ. विजयराजे ताले,राजेश पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेणूताई गावंडे, सुरेखाताई राऊत, जयश्रीताई जायले, उज्वलाताई पुंडकर निशाताई जायले, सांस्कृतिक सांस्कृतिक परिषदेच्या डॉ. वंदनाताई मोरे, प्रमिलाताई भिसे,सहसचिव श्रीकृष्ण जानोरकर,संघटक राजेश खुमकर, संतोष कुटे,तुषार जायले, मार्गदर्शक देवराव पाटील हागे,दिवाकरराव पाटील, बाबासाहेब गावंडे, विजयराव देशमुख,डॉ. दीपक मोरे, डॉ. मिलिंद चौखंडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, प्रा . डॉ. रामेश्वर भिसे,डॉ, विजयराव जाधव, श्रीकांत बिहाडे, अनिल विखे ,अविनाश पाटील, डॉ. निलेश मोहोड, रामेश्वर सपकाळ ,प्रचार प्रमुख सविताताई कुटे ,विष्णू गावंडे ,विभागीय सदस्य प्राचार्य दिलीपराव आंबेकर ,राज्य कार्यकारणी सदस्य प्रशांत बुले, संजय राळे,अविनाश डिक्कर, गजाननराव बोर्डे ,.नंदकिशोर हिंगणकर, वाल्मीक भगत, सर्व तालुका पदाधिकारी सर्व कक्ष पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात संपन्न होणार आहे.