सोमेश्वर तळेगाव ची केळी सातासमुद्रापार निर्यात. बागायतदार खारोडे कुटूंबाची मेहनत फळाला.
सोमेश्वर तळेगाव ची केळी सातासमुद्रापार निर्यात. बागायतदार खारोडे कुटूंबाची मेहनत फळाला.
सोमेश्वर तळेगाव ची केळी सातासमुद्रापार निर्यात. बागायतदार खारोडे कुटूंबाची मेहनत फळाला.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव सोमेश्वर महादेवाचे गाव. येथील बागायतदार माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील खारोडे यांचे गावगाडा एक वाडा पद्धतीचे कुटुंब. शेतीमाती शी नाळ ठेवून किशोर, विलास,सुधीर अशी भावंडे आपापल्या पद्धतीचा अवलंब करून समाजात आपले स्थान ठेवून प्रपंच गाडा हाकताना दिसतात यामध्ये किशोर पाटील सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, विलास पाटील, सुधीर पाटील हे सर्व प्रयोगशील शेतिनिष्ठ शेतकरी, सुधीर पाटील आपल्या सर्जा राजा वर जीवापार प्रेम करून गोवत्स प्रेमी…सर्व आपल्या कामात राम शोधणारे कुटुंब…शेतीत विविध प्रयोग करून राबणारे…

शेतीत विविध प्रयोग खारोडे कुटुंब करित असतात यावर्षी विलास पाटील खारोडे यांनी भावंडांच्या साथीने वडीलांचे मार्गदर्शनात केळी पिकाचे विक्रमी पिक घेवून पिक सातासमुद्रापार निर्यात करण्याचा उपक्रम केला. केळी पिकाची उत्तम मशागत करून आपला माल निर्यातक्षम कसा तयार होईल, याकरिता त्यांनी भरपूर मेहनत घेतली. केळी पिकाची लागवड ते मशागतीपर्यंत व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळे सदर पीक निर्यातक्षम बनले व आज त्यांची केळी सातासमुद्रापार रवाना होत आहे.

केळी पिकाची व्यवस्थित कापणी, प्रतवारी करून घड स्वच्छ करून बॉक्स पॅकिंग करण्यात आले. सदर बॉक्स 1500 क्विंटल केळी दिल्लीकडे रवाना झाली. नंतर दिल्लीवरून कंटेनरने केळी फळ पिकाचा प्रवास विक्रीकरिता इराण या देशात निर्यात केली आहे.

सदर क्षेत्रावर विलास जनार्दन पाटील खारोडे यांनी चांगले उत्पन्न घेतल्यामुळे त्यांच्या बागेला तालुका कृषी अधिकारी तेल्हारा शुभम बुरांडे तसेच मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले. शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकासोबतच फळ पिकाची जोड दिल्यास आपल्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते, याबाबत शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी प्रोत्साहित केले. तसेच आपल्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे यांनी फळ पिकाच्या अनुदानाबाबत सविस्तर माहिती दिली व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त फळ पिकाचे उत्पन्न चांगल्या दर्जाचे व निर्यातक्षम घ्यावे, जेणेकरून आपल्याला बाजार भाव जास्तीचा मिळून आपला आर्थिक स्तर उंचावेल. यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करून असताना कृषी विभाग आपल्या सोबत सदैव तत्पर राहील, याची हमी त्यांनी दिली. सदर केळी पिकाचे परदेशात निर्यात करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन प्रगतिशील शेतकरी सचिन कोरडे यांचे लाभले. प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी मनोजकुमार सारभुकन तर आभार विलास खारोडे यांनी मानले.

कार्यक्रमाला माजी पोलीस जनार्दन पाटील खारोडे, बाबुराव खारोडे, डॉ.भास्करराव खारोडे, किशोर खारोडे, सुधीर खारोडे, सदानंद खारोडे,ओंकारराव ठोंबरे, अशोकराव मानखैर, गुणवतंराव खारोडे, रामकृष्ण खारोडे, गोपाळराव टापरे,उध्दवराव मानखैर, शिवाजी खारोडे, बटिं खारोडे, प्रविण पाटील, हिम्मत खारोडे, प्रतिक खारोडे सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
