बेलखेड शंकरपटात प्रथम बक्षीसाचे मानकरी चिखलीचे सोन्या-माऊली.
दि. 24-25 मार्च दोन दिवशीय भव्य शंकरपट उत्साहात संपन्न.
बेलखेड शंकरपटात प्रथम बक्षीसाचे मानकरी चिखलीचे सोन्या-माऊली.
दि. 24-25 मार्च दोन दिवशीय भव्य शंकरपट उत्साहात संपन्न.

बेलखेड – अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे भव्य शंकरपट आयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ व समस्त गावकरी यांच्या वतीने आराध्यदैवत मोठा मारोती यांच्या कृपाशीर्वादाने दि. 24-25 मार्चला संपन्न झाले.

दोन दिवसीय शंकरपटाचे उद्घाटन बेलखेड चे माजी सरपंच गजाननराव उंबरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत तर बक्षिस वितरण माजी उपसरपंच बाळासाहेब निमकर्डे यांचे प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लाखों रूपयांच्या बक्षिसे वाटण्यात आले.

“अ” गटात प्रथम बक्षिसाचे मानकरी चिखली येथील शरद नाना हांडे यांचे सोन्या-माऊली हे ठरले त्यांनी 5 सेकंद 65पाईंट मध्ये अंतर कापले., व्दितीय बक्षीस राजनगाव येथील शरयु कैलास हिवाळे यांच्या लाडक्या-बागी जोडीने 5.67 मध्ये, तृतीय बक्षीस उमरा येथील सागर वानखडे यांच्या शक्ती-फायटर ने5.77 मध्ये, चतुर्थ बक्षीस आब्रा बॉर्डर येथील संजय राठोड, शिवाणी विजय राठोड यांच्या लाडक्या आयकॉन ने 5.90 मध्ये, पाचवे बक्षीस चांडोळ येथील आई सप्तशृंगी ग्रुपचे लक्ष्या- मन्या या जोडीने 6.02 मध्ये अंतर कापून बक्षिसाचे मानकरी ठरले.

“क” गटातील बक्षिसाचे मानकरी प्रथम बक्षीस चिंचोली बु येथील प्रविण कैकांडी यांच्या चिक्या- फायर ने 5.65 मध्ये, व्दितीय बक्षीस गुम्मी येथील स्वराज नोटा यांच्या शिवशंभू-बादल ने 5.80 मध्ये, तृतीय बक्षीस एकलासपूर येथील प्रमोद पाटील दिवटे यांच्या फायटर -भैरव ने 5.80 मध्ये चवथे बक्षीस गुम्मी येथील विनायक पाटील यांच्या ओम- रूद्रा ने 5.87 मध्ये, पाचवे बक्षीस एकलासपूर येथील अतुल चौधरी यांच्या बादशहा-सुंदर ने 5.99 मध्ये अंतर कापून बक्षिसाचे मानकरी ठरले.
बेलखेड येथील स्व. लीलाबाई मनोहरराव टोहरे यांच्या शेतात दि. 24-25 मार्चला आयोजित शंकरपटा ला परिसरातील शंकरपट प्रेमीची संख्या अफाट होती. या शंकरपट मध्ये घड्याळ मालक उल्हासराव दाभाडे व त्यांचे सहकारी यांनी चोख काम पाहिले.
दोन दिवसीय शंकर पट आयोजन समितीचे विक्रांत नागपूरे, प्रमोद अरूडकार, गोपाल राऊत, अनंता वानखडे, रोहित नागपूरे पवन राऊत,पशु वैद्यक राजु सुशिर, सुनिल राऊत, गजानन कुयटे, शे. मज्जीत मेंबर, अनिस चौधरी, शे. सादीक मुल्लाजी, शे. इरफान, राजु मसुरकर, ओम आप्पा, पवन बोंबटकार, अंकीत सुशिर, गणेश सुशिर, कुणाल इंगळे, अमोल जाधव, संजय भगत इत्यादी आयोजन समिती सह ग्रामस्थ बेलखेड यांनी शंकर पट यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.