स्व. लक्ष्मीबाई काठोळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोहगाव यांच्या वतीने आदिवासी समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न.
स्व. लक्ष्मीबाई काठोळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोहगाव यांच्या वतीने आदिवासी समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न.
स्व. लक्ष्मीबाई काठोळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोहगाव यांच्या वतीने आदिवासी समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न.

गोहगाव (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील स्व. लक्ष्मीबाई काठोळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोहगाव यांच्या मार्फत आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी आयोजित सामूहिक विवाह सोहळा दिनांक २८ जून २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनेक आदिवासी जोडप्यांनी एकत्र येऊन विवाहबंधन स्वीकारले.

संस्थेच्या सामाजिक दृष्टिकोनातून चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला. पावसाने हजेरी न लावल्याने कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत अॅड. ज्योती अवचार,तेजराव पाटील वानखेडे,रमेश जाधव, सुनील रहाटे (सरपंच),सुनील मिसळ,महादेवराव ठाकरे,गणेश जूनघरे,प्रकाश पवार,दिपू पवार,राजू भोसले,वसंता आसोले सह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना आशीर्वाद दिले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
आदिवासी समाजातील मुला-मुलींच्या विवाहासाठी आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह खर्च, विधी, भोजन आणि इतर व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. अशा उपक्रमांमुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळतो आणि सामाजिक समरसता वाढते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे गोहगाव परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.