आपला जिल्हा

तेल्हारा नगर परिषद उपाध्यक्षपदी भाजपाचे सचिन पाटील तायडे.

स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे गजानन गायकवाड व मोनिका वाघ.

तेल्हारा नगर परिषद उपाध्यक्षपदी भाजपाचे सचिन पाटील तायडे.

स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे गजानन गायकवाड व मोनिका वाघ.

तेल्हारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदाची निवड दि.13 जानेवारी रोजी स्थानिक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली. यामध्ये उपाध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक सचिन तुळशीराम तायडे तर स्वीकृत सदस्य पदी भाजपा तालुका सरचिटणीस गजानन आकाराम गायकवाड, महिला आघाडी तालुका मंडळ अध्यक्षा सौ. मोनिका प्रदीप वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा वैशाली पालीवाल व मुख्याधिकारी सतिश गावंडे यांची उपस्थिती होती.

तेल्हारा नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडून दि.21 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या वैशाली जितेंद्र पालीवाल यांच्यासह भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले. तसेच एक अपक्ष अमित अग्रवाल व नगरसेवा समितीचे विजयसिंह जयसिंह बलोदे यांनी भाजपला पाठींबा दिल्याने भाजपचे संख्याबळ 15 झाले. मात्र उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्य पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले होते. अखेर उपाध्यक्ष पदी सचिन तायडे व स्वीकृत सदस्य पदी गजानन गायकवाड व मोनिका वाघ यांची निवड झाल्याने फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी नवनियुक्त नगराध्यक्षा वैशाली जितेंद्र पालीवाल, गटनेते प्रशांत उर्फ अतुल विखे,सदस्य सतीश जयस्वाल, अरुणा ठाकरे, गायत्री सोळंके, विजयसिंह बलोदे, जितेंद्र राठी, साक्षी वानखडे, भक्ती छागाणी, संध्या गावत्रे, अमित अग्रवाल, रुपाली हागे, रुपेश चव्हाण, जया बघ्घन, प्रवीण ढोके यांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, युवा मोर्चा, नगरसेवा समिती, शेतकरी सहकार आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!