पर्यावरण दिनी पर्यावरण प्रेमी प्रतिक उंबरकर विवाहबद्ध.
गर्भ श्रीमंती असताना विवाह समाजात आदर्शवत.
पर्यावरण दिनी पर्यावरण प्रेमी प्रतिक उंबरकर नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध.
गर्भ श्रीमंती असताना वृक्षारोपण करून नोंदणी विवाह समाजात आदर्शवत.

आजच्या काळात विवाह सोहळा आपले वैभव, प्रतिष्ठा आणि श्रीमंत चे दर्शन करणारे सोहळे ठरत आहेत.बडेजाव पणाचे दिखाऊ दर्शन,फोटो सेशन, हजारो रुपयांचे डेकोरेशन, ड्रोन एंट्री, स्मोक बॉम्ब्स, महागडे कपडे आणि अवाढव्य मेजवानी या सगळ्याचा गाजावाजा दाखवून आम्ही किती श्रीमंत आहोत हे दाखविले जात असले तरी या सर्वांना फाटा देत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील गर्भ श्रीमंत, दानशूर व्यक्तीमत्व बाबजी उंबरकर यांचे पणतू,माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे माजी तेल्हारा तालुका अध्यक्ष,बेलखेड चे माजी सरपंच गजाननराव उंबरकर यांचे जेष्ठ चिरंजीव उच्च शिक्षित भूवैज्ञानिक, पर्यावरण प्रेमी प्रतिक यांनी महात्मा ज्योतिबा फुले तत्वप्रणाली नुसार सावित्रीबाई फुले – ज्योतिबांना आदर्शवत ठेवून अगदी साध्या पद्धतीने विवाह करण्याची इच्छा आपल्या घरातील जेष्ठ मंडळी जवळ व्यक्त केली. त्यांच्या या आदर्श विचार सरणीला सर्वानीच होकार दिला. विवाह तिथी न पाहता पर्यावरण प्रेमी प्रतिक ने आपली तिथी 5 जुन 2025 जागतिक पर्यावरण दिन निवडून तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु येथील प्रतिष्ठित नागरीक संजय राव ढोकणे यांची कन्या चि. सौ. कां. धनश्री हिचे सोबत ठरलेल्या साक्षगंध चे दिवशी च करण्याचे ठरले व त्यानुसार कुठलाही बडेजाव न करता अगदी जवळचे नातेवाईक, भाऊबंद यांच्या उपस्थितीत एक समाजाला आदर्श नोंदणी विवाह केला जागतिक पर्यावरण दिनी. भरमसाट पैसा, सोने नाणे असून सुद्धा दुसऱ्यांना नुसते ज्ञानाचे, आदर्शाचे डोस न देता स्वतः कृतीत आणून समाजाला आदर्श दाखवून दिला.भूजलतज्ञ असलेला प्रतिक अगदी साधा सरळ वळणाची जीवन पद्धतीने जगणारा युवक. प्रतिक सामाजिक भान जपणारे व्यक्तीमत्व असल्याचे त्याचे आदिवासी भागातील निर्माण या सामाजिक संस्थेतील काम पाहून दिसून येते. निर्माण या सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या युवकांच्या समुहात प्रतिक आपले अस्तित्व ठेवून आहे. ज्या पर्यावरण जपणूक करणारे कार्यासाठीच्या कामात युवा अवस्था घालवली त्याच जागतिक पर्यावरण दिनी संविधानिक पद्धतीने नोंदणी विवाह करण्याचे ठरवून आज जीवनातील सुखदायी वाटणाऱ्या वळणावर सुद्धा प्रतिक ने आपल्या उपजत गुणांची चुणूक दाखवून दिली. विवाह हा सहजीवनाचा पाया आहे, तो भक्कम असला पाहिजे. आपला जोडीदार निवडताना त्याचे सोबत पुढील सहजीवन श्रीमंतीचे दर्शन न घडवता साध्या पद्धतीचा अवलंब नवदाम्पत्याने स्विकारला. आज सर्व काही असताना त्याचे कुटुंब चार पाच हजार लोकांना बोलावून लग्न करू शकले असते, लोकही आशिर्वाद, भोजनावळी साठी उपस्थित राहिले असते परंतु प्रतिक ने सहजीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी निवडलेला मार्ग हा प्रेरणादायी व समाजाने आदर्श घेणारा असा आहे. त्यामुळे मोजकी उपस्थिती असली तरी खऱ्या अर्थाने प्रतिक-धनश्री नवदाम्पत्याने महात्मा ज्योतिबा फुले तत्वप्रणाली चा अवलंब करून विवाह करण्याच्या निवडलेल्या मार्गाला भक्कम असे शुभा आशिर्वाद त्यांचे पाठीशी आहेत ते त्यांना पुढील आयुष्यात पुंजी ठरतील. त्यांना मिळत असलेले आशिर्वाद त्यांचे कौतुकास्पद कामाचे मनापासून चे आहेत ते आदर्शवादी… चि. प्रतिक व चि. सौ. कां.धनश्री यांना आदर्श विवाह निमित्ताने खूप खूप शुभकामना…

कृतीतून प्रतिक चे विवाह पद्धती वैचारिक देण –
1. शेतकरी व शेतमजूर यांच्यावर खर्चिक विवाह करण्याचा सामाजिक दबाव कमी करणे, लहान शेतकरी घरच्या विवाह सोहळ्यानिमित्त कर्जबाजारी होतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसतात. आयुष्यात व्यक्ती शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च होणे हे ग्रामीण भागाची आर्थिक कंबरडे मोडण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
2. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे मुख्य कारण म्हणजे संविधनिक पद्धतीने विवाह करण्याची इच्छा होती जेणेकरून विवाहबद्ध होताना जातियप्रधान व पुरुषप्रधान प्रथा कमी करणे हे होते. जसे ‘कन्यादान’ ह्या प्रथेत वडील वराला आपली कन्या दान करतात. स्त्री ही दानाची वस्तू नाही आणि एका पुरुषाला स्त्री चे दान करणे किंवा दान स्वरूपात स्त्रीचा स्वीकारण्याचा अधिकार सुद्धा नसायला हवा. नेहमी विवाह मध्ये पुरुष उजव्या बाजूला उभा असतो पण हा विवाह पार पाडताना नवरी ही उजव्या बाजूला उभी होती.
3. विवाह करताना जेवढ्या साध्या पद्धतीने होणार तेवढी पर्यावरणाची हानी कमी होणार. साक्षगांधाच्या दिवशी विवाह केल्याने पुढील बरेच कार्यक्रम कमी झाले. या विवाहात डिजे, बैंड, फटाके जे पर्यावरणाला घातक आहेत त्यांचे उपयोग टाळण्यात आले. नवरीने सासरी येण्या अगोदर शेतात वृक्षारोपण केले हे उलेखनीय…. प्रतिक उंबरकर
सत्यशील प्र सावरकर
मा उपसरपंच बेलखेड
पत्रकार तेल्हारा तालुका.