भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी उमेश पवार.
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी उमेश पवार.
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी उमेश पवार.

अकोला दी. -भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी अकोला जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या चळवळी चे कार्यकर्ते माजी आघाडी प्रमुख उमेश पवार यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे , पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर, आमदार प्रकाश भारसाकडे, संघटन उपाध्यक्ष डॉक्टर उपेंद्र कोठेकर ,आमदार हरीश पिंपळे, जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण पोटे, नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर , विजय अग्रवाल यांच्याशी चर्चा विनिमय करून महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नासाठी सातत्याने जनसंपर्काच्या माध्यमातून शासनाकडे प्रश्न मांडणी करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश पवार यांच्या कार्याची दखल घेऊन उपाध्यक्ष म्हणून प्रदेशाने निवड केली आहे. अकोला जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध संघटनेने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.