आपला जिल्हाआपला जिल्हा अकोला

तेल्हाऱ्यात २० जुलै रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ १३७ रिक्त पदे: तरुणांना सुवर्णसंधी. 

तेल्हाऱ्यात २० जुलै रोजी 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' १३७ रिक्त पदे: तरुणांना सुवर्णसंधी. 

तेल्हाऱ्यात २० जुलै रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ १३७ रिक्त पदे: तरुणांना सुवर्णसंधी. 

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी अकोल्यात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. 

हा मेळावा सोमवार, २० जुलै २०२६ रोजी डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, तेल्हारा, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (अकोला), मॉडेल करिअर सेंटर (अकोला) आणि डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय (तेल्हारा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे.

मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये : एकूण रिक्त पदे: १३७ जागांसाठी भरती.

सहभागी कंपन्या: विविध क्षेत्रातील नामांकित १३ कंपन्यांचा सहभाग.प्रमुख नियोक्ते: वैभव बायोटेक, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, एल. अँड टी. फायनान्स, वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

निवड प्रक्रिया: कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी देणार आहेत.

ऑनलाईन नोंदणी कशी करावी?इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:वेबसाईट: www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

लॉगिन: ‘Employment’ टॅबवर क्लिक करून ‘Job Seeker’ पर्याय निवडा आणि आपल्या आयडी-पासवर्डने साईन इन करा.मेळावा निवडा: होम पेजवरील ‘Job Fair’ पर्याय निवडून ‘अकोला’ जिल्हा निवडा. त्यानंतर २० जुलैच्या मेळाव्यावर क्लिक करा.अपली नोंदणी: रिक्त पदांच्या पात्रतेनुसार ‘Apply’ बटणावर क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करा. यशस्वी नोंदणीनंतर मिळणाऱ्या रजिस्ट्रेशन स्लिपची प्रिंट काढा.

मेळाव्याचे ठिकाण: डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव (तेल्हारा), जि. अकोला.

कागदपत्रे: उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी स्वतःचा बायोडाटा (रिझ्युमे), पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

संपर्क क्रमांक: कोणत्याही अडचणीसाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्या (०७२४) – २४३३८४९ या क्रमांकावर किंवा akolarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.अकोला जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल सु. शेळके यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!