तेल्हारा प्रज्ञावंत बुद्ध विहारात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पदाधिकारी व महिला आघाडीशी साधला संवाद.!
तेल्हारा प्रज्ञावंत बुद्ध विहारात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पदाधिकारी व महिला आघाडीशी साधला संवाद.!
तेल्हारा प्रज्ञावंत बुद्ध विहारात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पदाधिकारी व महिला आघाडीशी साधला संवाद.!

तेल्हारा : प्रज्ञावंत बुद्ध विहार, बेलखेड रोड येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी काळातील संघटनात्मक कार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस प्रमोद देंडवे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, मिलिंद इंगळे, महासचिव वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, सौ. आम्रपालीताई खंडारे, अध्यक्ष वंचित महिला आघाडी अकोला जिल्हा, श्रीकांत घोगरे, अध्यक्ष वंचित युवक आघाडी अकोला जिल्हा, राजकुमार दामोदर, महासचिव वंचित युवक आघाडी अकोला जिल्हा, संगीताताई अढाऊ, माजी जि.प. अध्यक्षा, प्रतिभाताई भोजने, माजी जि.प. अध्यक्षा, अशोक दारोकार वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष तेल्हारा, मधुसूदन बंरींगे, महासचिव वंचित बहुजन आघाडी तेल्हारा, नितीन वानखडे, युवक आघाडी वंचित उपाध्यक्ष अकोला जिल्हा, विघाताई शामस्कार, तालुकाध्यक्ष महिला आघाडी तेल्हारा तसेच जियाशह, अध्यक्ष युवक आघाडी वंचित तेल्हारा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच तेल्हारा तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला बळकटी देणे तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रभावीपणे मांडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
समाजातील वंचित, शोषित व दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले. आगामी काळात संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रज्ञावंत बुद्ध विहार, बेलखेड रोड येथे झालेल्या या संवाद बैठकीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बैठकीस तेल्हारा तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.