सत्तरीपुढील व्यक्तींना उपचारांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’., जिल्ह्यात गावोगाव मोहिम राबविणार.
सत्तरीपुढील व्यक्तींना उपचारांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’., जिल्ह्यात गावोगाव मोहिम राबविणार.
सत्तरीपुढील व्यक्तींना उपचारांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’., जिल्ह्यात गावोगाव मोहिम राबविणार.

अकोला, दि. 18 : एकत्रित आयुष्मान भारत योजना- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत 70 वर्षांपुढील व्यक्तींसाठी ‘वय वंदना कार्ड’ मोहिम जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे.
त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी जिल्ह्यात सेतू केंद्रे किंवा आपल्या गावातील आशासेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वयाची 70 वर्ष पूर्ण झालेल्या किंवा त्यावरील वयाच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वय वंदना कार्डधारकांना अंगीकृत रूग्णालयात 5 लाख रू. चे वार्षिक विमा कवच दिले जाणार आहे. आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रू. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष विनामूल्य उपचार मिळतो. तथापि, गंभीर आजारांच्या ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी उपचारांची गरज भासू शकते. अशा 70 वर्षांवरील रूग्णांना वय वंदना कार्डद्वारे अतिरिक्त उपचार घेता येतात.