जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी उभारला सामान्य शिक्षक हक्क लढा.
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्याप्रलंबित

अकोला दि.
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत.अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत.सन २०२४ पासून जिल्ह्यात विस्तार अधिकारी,केद्रप्रमुख , उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदे रिक्त असून सहाय्यक शिक्षकांना आपले शैक्षणीक कार्य सांभाळत अतिरिक्त प्रभार सांभाळावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून पदोन्नती बाबत सर्व संघटनांनी निवेदन देवून ही शिक्षण विभाग पदोन्नती देत नाही.या संबधी नुकतेच शिक्षणराज्यमंत्री पंकज भोयर यांना आमदार रणधीर सावरकर यांचे उपस्थितीत पदोन्नती व मंजूर निवड श्रेणी प्रस्ताव अंमलबजावणी बाबत निवेदन दिले होते त्यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिनांक २० फेब्रुवारी पर्यत पदोन्नती वेळापत्रक जाहिर करून तातडीने पदोन्नती देण्याचे निर्देश ना.पंकज भोयर यांनी दिले होते तरी सुद्धा शिक्षण विभाग वेळकाढू धोरण ठेवत पदोन्नती वेळापत्रक जाहिर करत नसल्याने काही संघटना यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून अवगत केले आहे.
जिल्ह्यातील ६५२ शिक्षक निवडश्रेणी पात्र असून १७० जागावर पदोन्नती साठी शिक्षक पात्र आहेत.सदर पदोन्नती तात्काळ व्हावी ,मंजूर निवडश्रेणी पात्र शिक्षकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी सामान्य शिक्षकांनी लढा उभारला असून न्यायीक मार्गाने हक्क मिळावा म्हणून जि.प .कर्मचारी भवन येथे नुकतीच सभा होवून आंदोलनाची पुढील ठरवण्यासाठी सभा संपन्न झाली आहे.सभेस निलेश वसंतराव काळे,विलास भिकाराम मोरे,मोहन तराळे,प्रविण गायकवाड,पुंडलिक भदे,सुनिल काळे,महेद्र भगत,मंगेश दसोडे,नितीन गोरे,निर्मलकुमार आगडे,मनोज जयस्वाल,वसंत सेवलकर,गजानन खरडे,संघर्ष सावरकर,विनोद महल्ले,दिपक कोकणे ,देवानंद जवादे,हरिदास सावळे,प्रशांत सेवतकर,संतोष देशमुख,विलास बारगीर उपस्थित होते.या न्याय मागणीसाठी आज झालेला पदोन्नती आणि निवड श्रेणी बाबत निर्णायक सभेमधे दिनांक २७फेब्रुवारी पर्यंत प्रशासनाचे वाट पाहणे.त्यानंत पदोन्नती आणि निवड श्रेणी करिता अंतीम लढाई म्हणजे साखळी उपोषण करणे यावर उपस्थीत सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी आणि शिक्षकांनी सहमती दर्शवली.