भारतीय एकात्मता व वीर सैनिकांच्या सन्मानार्थ वंचितची तिरंगा रॅली.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
भारतीय एकात्मता व वीर सैनिकांच्या सन्मानार्थ वंचितची तिरंगा रॅली.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारत देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन दि. ११ मे ला सकाळी ११ वाजता करण्यात आले.
सदर रॅली तेल्हारा शहरातील महाराजा अग्रेसन चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली. पुढे संत तुकाराम महाराज चौकात हारार्पण करण्यात आले.
रॅलीत “भारतीय सैन्याचा विजय असो”, “जय भारत,” भारत जिंदाबाद जिंदाबाद “अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळेस माजी सैनिक मेजर धुंदळे, मेजर बाळासाहेब बोदडे, मेजर नरेश बांगर यांनी तिरंगा घेऊन रॅलीचे नेतृत्व केले. यावेळेस वंचित बहुजन महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले शाहू विदवत सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर रॅलीस तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, महासचिव मधुसूदन बरिंगे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ गवारगुरू, पंचायत समिती माजी सभापती आम्रपाली गवारगुरू, माजी उपसभापती मोबीन गुरुजी, विद्वत सभा जिल्हा समन्वयक सिद्धार्थ शामस्कार सर, जेष्ठ कार्येकर्ते बाबूजी खोब्रागडे, श्रीकृष्ण जुबळे, रामकृष्ण तायडे,सुनील वानखडे,रवि भिसे,सौदागर, ज्ञानेश्वर बाहकर, संजय तायडे,संजय हिवराळे, दिपक बायस्कर, अतुल देशमुख महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्याताई शामस्कार, माजी जिल्हा सचिव संतोषीताई निखाडे, विना मोहोड,प्राजक्ता निखाडे, सुनंदा तायडे, झिया शहा, राजेश दारोकार, संदीप गवई,नितेश वानखडे प्रविण पोहरकार, विजयबाप्पू देशमुख,गजानन दामोदर विकास दामोदर,अनिल मोहोड पंजाबराव तायडे,सदानंद खारोडे, मिलिंद दांडगे, डॉ. प्रशांत इंगळे, मो. रजिक, नंदकिशोर अढाऊ गुरुजी, प्रफुल्ल मोरे, प्रविण डोंगरे,बबलू दारोकार, दीपक दारोकार, प्रविण उरकडे, आनंद बोदडे, शे. मुज्जफ़र, ई कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शाहिद विरांना श्रदांजली देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.