गुणवत्ते सोबतच सुसंस्कारही महत्त्वाचे – सुरेशदादा खोटरे.
स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरसोली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
गुणवत्ते सोबतच सुसंस्कारही महत्त्वाचे – सुरेशदादा खोटरे.
स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरसोली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.

विद्यार्थ्यांनी मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करावी त्याचबरोबर विद्यार्थी जीवनात सुसंस्कारही महत्त्वाचे आहेत. असे उदगार सुरेशदादा खोटरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना काढले आहेत. स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरसोली ता तेल्हारा येथे वर्ग बारावी कला मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग पाचवी ते अकरावी पर्यंत चा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ सिरसोली चे अध्यक्ष सुरेशदादा खोटरे हे होते तर प्रमुख पाहुणे निळकंठ काळे सर, पालक प्रतिनिधी सुनील राऊत व मंगेश माकोने,प्राचार्य मिलिंद खोटरे उपस्थित होते.याप्रसंगी वर्ग बारावी कला मधून सर्वप्रथम क्रमांक असलेली विद्यार्थिनी कु.आचल राजेश माकोने,कु. गौरी पांडुरंग चिकटे (द्वितीय ), कु. समीक्षा विनायक वनकर (तृतीय ) तसेच गणित ऑलिंपियाड मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी कुमारी गुंजन भारसाकळे या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार संस्थाध्यक्ष सुरेशदादा खोटरे यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश तेलगोटे यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये सुरेशदादा खोटरे यांनी विद्यार्थी जीवनामध्ये शिस्त, मेहनत, आज्ञापालन, अभ्यास याचे महत्त्व सांगितले. वर्ग पाचवी ते नववी तसेच अकरावीचा निकाल याप्रसंगी जाहीर करण्यात आला व गुणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले.यावर्षी पासून वर्ग अकरावीच्या ऍडमिशन ऑनलाईन होणार असून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऑनलाईन ऍडमिशन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी एक मार्गदर्शक कक्ष स्थापन करण्यात येणार असून वर्ग दहावी च्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संतोष नहाटे यांनी केले तर आभार श्री प्रमोद आखरे सर यांनी मानले.
कार्यक्रमाला जगदेव कात्रे सर,नंदाताई गावंडे मॅडम, अंजली खोटरे मॅडम, उमेश तेलगोटे सर, संगीता डाबेराव मॅडम, योगेश मैड सर, के. एस.सोलकर,गजानन भारसाकडे तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.