आपला जिल्हा

हेमंत गावंडे यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे.

नागरिकांचा विशाल मूक मोर्चा व कँडल मार्च.

हेमंत गावंडे यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे.
नागरिकांचा विशाल मूक मोर्चा व कँडल मार्च.

हिवरखेड दि.
हिवरखेड येथील हेमंत उमेश गावंडे हे दि. 16-3-2025 रोजी पत्नी हर्षा व आपल्या अडीच वर्षीय मुलासोबत रेल्वेने आकोट वरून अकोला गेले असता अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली असता रवी परमार या परप्रांतीय सराईत, अट्टल गुन्हेगाराने हेमंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडून पळ काढला, स्व. हेमंत यांनी चोराला पकडण्यासाठी चोराचा पाठलाग केला. पण रात्रीच्या अंधारात तेथील झुडपात रवी परमार या बदमाशाने स्व. हेमंत गावंडे यांच्यावर हल्ला चढविला व त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने प्रहार करून त्यांची निर्घृण खून केला. पोलिसांनी या चोरट्याला अटक केले असले तरी कठोर शिक्षा ठोठावली जावी व इतर मागण्यासाठी भव्य मूक मोर्चा व कँडल मार्च काढून रोष व्यक्त केला. यावेळी हिवरखेड वासियांनी स्वयंस्फूर्तीने या मुक मोर्चा मध्ये सहभाग नोंदविला.


नागरिकांच्या प्रमुख मागण्या मध्ये,1) हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जावा, याकरिता गावंडे कुटुंबाला चांगला नामांकित सरकारी वकील उपलब्ध करून द्यावा व हल्लेखोराला फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून गुन्हेगारीवर वचक बसेल.
2) ही घटना जेंव्हा घडली तेंव्हा अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म वर एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे जे कोणी ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी असतील त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
3) स्व. हेमंत गावंडे यांच्या पत्नी श्रीमती हर्षा हेमंत गावंडे पोलीस चौकीत गेल्या असता तिथे कर्तव्यावर हजर असलेले अधिकारी अर्चना गाढवे यांनी आरोपीचा पाठलाग न करता स्व. हेमंत गावंडे यांचा फोटो द्या, त्यांचा मोबाईल नंबर द्या अशा विनाकारणच्या चौकशी मध्ये वेळ घालवला त्यामुळे स्व. हेमंत गावंडे यांचा जीव गेला. या अधिकाऱ्याला सुद्धा सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
4)अकोला रेल्वे स्टेशनवरील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून तिथे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कमीतकमी दोन पोलीस नियुक्त करावे.
5)अकोला-आकोट रेल्वेमध्ये चिडिमारीचे वा चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे मुली वा महिलांसाठी हा प्रवास असुरक्षित झाला आहे म्हणून अकोला-आकोट रेल्वे प्रवासात रेल्वेमध्ये पोलीस कर्मचारी वाढवून प्रत्येक बोगीत पोलीस नियुक्त करावेत.
6)स्व. हेमंत उमेश गावंडे यांचा जीव रेल्वे पोलीस व प्रशासनाच्या चुकीमुळे गेला असल्यामुळे स्व. हेमंत गावंडे यांची पत्नी श्रीमती हर्षा हेमंत गावंडे ह्यांना रेल्वे किंवा इतर प्रशासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे वा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च रेल्वे विभाग व प्रशासनाने उचलावा.
7)अकोला जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशनचा परिसर गुन्हेगारीचे केंद्र बनलेले आहेत व तिथे अवैध व्यवसाय चालतात यावर कडक कारवाई करण्यात येऊन गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यात यावा व हा परिसर प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यात यावा. तसेच अकोला ते खंडवा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यातून मध्य रेल्वे कडे तात्काळ हस्तांतरित करण्यात यावा.
8) जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म व परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात यावे.
9) सदर निर्गुन हत्या करताना इतर आरोपी त्याच्यात सहभागी असल्यास त्याची चौकशी करून त्यांनाही फाशीची शिक्षा मिळावी.


उपरोक्त अनेक मागण्या करून संबंधित निवेदनाच्या प्रती गावंडे यांचे कुटुंबीय आणि हिवरखेड वासिया ततर्फे पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे,जिल्हाधिकारी अकोला,
आमदार प्रकाश भारसाकळे आकोट, पोलीस अधीक्षक अकोला, ठाणेदार हिवरखेड. इत्यादींना निवेदने पाठविण्यात आली आहेत.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!