तेल्हारा तालुक्यातील टरबूज खरबूज पिकाच्या नुकसानाची पाहणी.
जिल्हा कृषी अधिकारी व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर.
तेल्हारा तालुक्यातील टरबूज खरबूज पिकाच्या नुकसानाची पाहणी.
जिल्हा कृषी अधिकारी व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर.

टरबूज खरबूज पिकावर आलेल्या विशिष्ट अशा व्हायरसमुळे तेल्हारा तालुक्यातील बहुतांश गावातील टरबूज खरबूज पिक नष्ट झाले होते. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकाची आर्थिक नुकसान भरपाई सरसकट मिळावी यासाठी तेल्हारा तहसीलदार व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांना निवेदन देऊ तशी मागणी केली होती. मागणीची दखल घेत जिल्ह्यातून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्यासह आलेल्या पथकाने नुकसानग्रस्त हिंगणी, दानापूर भागात पाहणी करून शेतकऱ्यांचे नुकसानीचे अवलोकन केले. टरबूज खरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्या पथकाने केले. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकून घेतले.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर, हिंगणी कारला, सौंदळा,हिवरखेड, वारखेड, तळेगाव,दिवानझरी, चितारी, बेलखेड इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी या संदर्भात निवेदने दिली होती. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी पथकाने पाहणी केली. पाहणीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकरराव किरवे, जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर जाधव, तंत्र अधिकारी वाशिमकर, जिल्हा मोहिमा अधिकारी सालके, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ पी के राठोड, तालुका कृषी अधिकारी बुरांडे, जिल्हा गुन्हे नियंत्रण अधिकारी सतीश दांडगे, मंडळ अधिकारी गौरव राऊत,पंचायत समिती अधिकारी भारतसिंग चव्हाण इत्यादींनी देवानंद कोरडे, बंडूभाऊ नराजे, गणेश वाघ, सचिन कोरडे, हरीश काशिनाथ कोरडे या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली.
यावेळी सुभाष रौंदळे, श्रीपतराव विखे, ज्ञानेश्वर कोरडे, हरिचंद्र कोरडे,सोपान कोरडे, वैभव कोरडे, सुधाकर कोरडे, हरीश पाटील कोरडे,कमल शेठ राठी, मुकुल भोपळे, राजेश वानखडे,गणेश भड, दिलीप आखरे, गजानन आखरे, सचिन तिखट,शुभम इंगळे, सुभाष शित्रे, अरविंद खारोडे, मयूर होरे, दत्ता खोटे, मनोहर चेनेकर, सुजात बोडके इत्यादी सह परिसरातील दानापूर,वारखेड, हिंगणी, सौंदळा,हिवरखेड इत्यादी गावातील शेतकरी उपस्थित होते.