आपला जिल्हा अकोला

पत्रभेट प्रकाशन निर्मित धर्मभास्कर पू. सद्गुरुदास महाराज लिखित प्रवचन परिमल भाग तीन आणि श्री वासुदेव नळकांडे लिखित आराधना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. 

प्रवचन परिमल ही श्रीसद्गुरुदास महाराजांची वाड:मयीन मूर्तीच! - डॉ. गणेश गदाधरशास्त्री

प्रवचन परिमल ही श्रीसद्गुरुदास महाराजांची वाड:मयीन मूर्तीच! – डॉ. गणेश गदाधरशास्त्री

पत्रभेट प्रकाशन निर्मित धर्मभास्कर पू. सद्गुरुदास महाराज लिखित प्रवचन परिमल भाग तीन आणि श्री वासुदेव नळकांडे लिखित आराधना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. 

औदुंबरवाडी भांबेरी दिनांक २८ जुलै – “सद्गुरूंचा उपदेश हा गंगेच्या प्रवाहाप्रमाणे पवित्र असून तुमचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य त्यात असते. सद्गुरूंचे ग्रंथ म्हणजे त्यांची प्रत्यक्ष वाड:मयीन मूर्तीच असते”, असे डॉ. श्रीकांत शास्त्री गदाधर यांनी प्रतिपादन केले.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला औदुंबर वाडी भांबेरी येथे पत्रभेट प्रकाशन निर्मित धर्मभास्कर पू. सद्गुरुदास महाराज लिखित प्रवचन परिमल भाग तीन आणि श्री वासुदेव नळकांडे लिखित आराधना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन एका भव्य सोहळ्यात संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. गदाधर अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

सर्वप्रथम विष्णुदास महाराजांचे परमशिष्य सुरेशकाका देशमुख यांना अरविंद फाटक यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पू. विष्णुदास महाराज,पू. दादा लोखंडकार आणि पू. सदगुरूदास महाराज यांच्या तसबिरींचे आवरण मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्राचार्य डॉ. गोपाळराव ढोले म्हणाले की, भारतीय संस्कृती ही सनातन आहे आणि ती सनातन संस्कृती टिकवण्याचे कार्य हे आपले ग्रंथ करीत असतात. प्रत्येक गुरु भक्ताने आपल्या प्रेरणा व आपल्या विचारांना लिहून ठेवावे म्हणजे पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तेच कार्य वासुदेव नळकांडे यांच्या आराधना या कविता संग्रहाने आज केले आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

श्रीगुरुमंदिर परिवाराकडून मनीष उद्धव पुणे यांनी प्रवचन परिमल भाग ३ साठी प्रास्ताविक केले. वासुदेव नळकांडे यांनी ‘आराधना’ या काव्यसंग्रहाची पार्श्वभूमी सांगितली. निमिष गुर्जर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भांबेरी, तेल्हारा परिसरातील तसेच श्री गुरु मंदिर परिवारातील उपासक बहुसंख्येने उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!