शेतकरी कुटुंबातील अजय पांडे ला सहाय्यक पोलीस आयुक्त पद युवकांसाठी प्रेरणादायी. राज्यसेवा महाराष्ट्र रॅंक 32 सह उत्तीर्ण.
शेतकरी कुटुंबातील अजय पांडे ला सहाय्यक पोलीस आयुक्त पद युवकांसाठी प्रेरणादायी. राज्यसेवा महाराष्ट्र रॅंक 32 सह उत्तीर्ण.
शेतकरी कुटुंबातील अजय पांडे ला सहाय्यक पोलीस आयुक्त पद युवकांसाठी प्रेरणादायी. राज्यसेवा महाराष्ट्र रॅंक 32 सह उत्तीर्ण.

शेतकरी कुटुंबातील कुठल्याही मुलभूत सुविधा नसताना गावाखेड्यात राहून परिस्थितीशी सामना करून यशवंत होणारे विद्यार्थी हे अनेक नव्या गोष्टी करण्यासाठी उमेद प्रेरणादायी ठरतात असेच युवकांना प्रेरणादायी अजय पुरूषोत्तम पांडे. अजय यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले असून त्यांना आता पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पद मिळाले आहे. ते राज्यसेवा महाराष्ट्र रँक 32 सह उत्तीर्ण झाले आहेत.
अजय पुरूषोत्तम पांडे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेरी वडनेर या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. त्यांची घरची परिस्थिती बेताची. संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे. शेती हा आई-वडिलांचा पारंपारिक व्यवसाय आहे. अजय यांनी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. माध्यमिक व उच्च शिक्षणतून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयात शिक्षण घेतले. इयत्ता आठवी ते बारावीचे शिक्षण याच विद्यालयात घेतले.
बारावीनंतर पुढे काय करावे ? कोणते क्षेत्र निवडावे हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अजय ने सांगितले की, थोडा विचार केला त्यामध्ये असे लक्षात आले की आजकाल बरेच इंजिनीयर, डॉक्टर, इतर क्षेत्रात ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर एमपीएससी MPSC/स्पर्धा परीक्षेकडे वळत आहे. इतर क्षेत्रात रोजगाराची नोकरीच्या संधी खूप मर्यादित असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत बहिणीचे मार्गदर्शन मिळाले. ग्रॅज्युएशन सोबत सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास लवकर यश मिळू शकते तसेच त्यामध्ये ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षात एमपीएससीचा बराचसा अभ्यास पूर्ण होईल त्यामुळे लवकर यश मिळू शकेल त्यामुळे अजयने मार्च 2018 मध्ये बारावीची परीक्षा संपल्यानंतर करिअर व्हिजन अकॅडमी, चांदूरबाजार चे मुख्य मार्गदर्शक नितीन डेहा सर व श्रीमती निकिता अग्रवाल डेहा मॅडम (राज्य कर निरीक्षक/STI )यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल 2018 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यासोबत गोविंदराव सितारामजी टोम्पे कॉलेज, चांदूरबाजार, जिल्हा – अमरावती येथे बॅचलर ऑफ सायन्स (BSc-PCM group) ला प्रवेश घेतला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब व राज्यसेवा परीक्षा यांचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला परीक्षेचा अभ्यासक्रम सोबतच परीक्षेच्या साठी आवश्यक असणारे पुस्तके व इतर सामग्री गोळा करून योग्य रीतीने अभ्यासाला सुरुवात केली. यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई (Rank 11)व राज्य कर निरीक्षक(Rank45) पदी निवड झाली. त्यानंतर देखील आपल्या जॉबला न्याय देत मिळालेल्या वेळातून वेळ काढून देखील अजय पांडे यांनी राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. शेवटी केलेल्या मेहनतीला यश येवून माझी पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदी निवड झाली आहे. ( राज्यसेवा All Maharashtra Rank 32)
राज्यसेवेच्या चार मुख्य परीक्षा व तीन मुलाखतीनंतर आजचे यश मिळाले असल्याचे अजय सांगतो. आलेल्या अपयशांचे योग्य ते परीक्षण तसेच सुधारणा करत आजचे हे यश मिळाले आहे. या प्रवासामध्ये कुटुंबीयांनी तसेच नितीन डेहा सर, शिक्षक व मित्रांनी वेळोवेळी प्रेरित केल्यामुळे हे यश मिळू शकले. यापुढे मिळालेली प्रशासना मधील जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी नेहमी सकारात्मक रीतीने प्रयत्न करेल असे अजय पांडे सांगताना विसरले नाहीत.