मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण नागरिकांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण नागरिकांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण नागरिकांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन.

अकोला, दि. ३० : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू झाले असून, ‘बीएलओं’कडून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत. नागरिकांनी बीएलओ यांना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. याअनुषंगाने सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हाधिका-यांनी कामकाजाचा आढावाही घेतला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात आजपासून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत. यावेळी बीएलओ अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या गणनापत्रात नागरिकांनी आपली अचूक माहिती भरून फॉर्म त्यांच्याकडे जमा करावा. हा फॉर्म जलद भरून होतो. त्यामुळे सर्वांनी मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडून नागरिकांना आवश्यक माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे, आवश्यक माहिती व सहकार्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही मदत कक्ष स्थापण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, १९५० या टोल फ्री क्रमांकावरही माहिती मिळू शकेल.
प्रारुप मतदार यादी दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून त्यावर प्राप्त होणा-या दावे व हरकतीवरील निर्णयानंतर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे
बैठकीद्वारे जिल्हाधिका-यांनी कामकाजाचा आढावा घेतला. विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्य राष्ट्रीय कर्तव्य असून, बीएलओ, अधिकारी, कर्मचारी, तसेच सहभागी सर्व घटकांनी हे काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.