आपला जिल्हा अकोलाधार्मिक

देश- देव व धर्मकार्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे यांचे प्रतिपादन,दानापूर येथे विशाल हिंदू संमेलन संपन्न.

देश- देव व धर्मकार्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे यांचे प्रतिपादन,दानापूर येथे विशाल हिंदू संमेलन संपन्न.

देश- देव व धर्मकार्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे यांचे प्रतिपादन,दानापूर येथे विशाल हिंदू संमेलन संपन्न.

तेल्हारा दि.१७ जेव्हा जेव्हा या देशावर परकीय आक्रमणे झाली, आपले हिंदुत्व, संस्कृती व श्रेष्ठ परंपरा संकटात आली त्यावेळी बाराव्या शतकात संत नामदेवांनी विविध प्रांतात जाऊन धर्मकार्य केले इतिहासात पुरुषार्थ गाजविला. संत तुकारामांनी अशावेळी मावळे तयार केले. इस्लामिक आक्रणाच्या वेळी संत एकनाथांनी शूर साधक युद्धात उतरविले. हा शौर्याचा इतिहास नव्या पिढीने विसरता कामा नये. दिल्लीत सोळा वर्षीय साक्षीचे एकतर्फी लव्ह जिहाद व तिची क्रूरपणे झालेली हत्या या घटनेचे विदारक वर्णन करत आपण कधी शूर होणार? अन्यायाविरुद्ध केव्हा उभे राहणार? असा प्रश्न उपस्थित करून आपण हिंदू म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. देव, देश व धर्म रक्षणार्थ हिंदू म्हणून एकजूट व्हा. असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे (देहुकर) यांनी दानापूर येथे सोमवार दि.१६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी दानापूर मंडळाच्या सकल हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना केले.

आपल्या उदबोधनात त्यांनी विविध दृष्टांत सांगून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर होते. हा देश साधू संतांचा, शूरवीरांचा आहे. हे राष्ट्र हिंदूंचे आहे. त्याचा सन्मान करा असा उपदेशही त्यांनी केला.

ग्राम दानापूर येथील शिक्षक कॉलनी,आई भवानी मंदिराजवळ पार पडलेल्या हिंदू संमेलनात वारखेड, सौंदळा, हिंगणी बु., हिंगणी खू., हयातपुर, सोनवाडी, वारी भैरवगड, नागरतास, बारूखेडा, पिंपळखेडा व दानापूर येथील हिंदू युवक स्त्री-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र वारी हनुमान मंदिर येथील महंत कृष्णानंदजी भारती महाराज होते, तर प्रमुख वक्ते म्हणून संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे, रा स्व संघाचे अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, अकोला महानगर पर्यावरण संरक्षण गतिविधि नारी शक्ती उपप्रमुख हेमांगी प्रकाश गाडगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व हारार्पण करण्यात आले. मंचावरील मान्यवरांचे हिंदू संमेलन संयोजक गोपाल बोरसे, हभप सुधाकर फोकमारे, सहसंयोजक प्रशांत अनासने, सौ.सरस्वती सागर राऊत यांनी शाल श्रीफळ व हारार्पणाने स्वागत केले.

पंच परिवर्तन ही नव्या भारताची पंचसूत्री – नरेंद्र देशपांडे यांचे उदगार- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सांगितलेली सामाजिक बदलांवर भर देणारी पंचपरिवर्तन पंचसूत्री नव्याभारताची राष्ट्राचा सर्वांगीण विकास व प्रगतीस हातभार लावणारी आहे .त्यात सामाजिक समरसता ,पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व.आधारित जीवन, नागरी कर्तव्य यांचा समावेश असून प्रत्येकाने त्याचा अंगीकार करावा. सारे जग भारताकडे बघते आहे. सगळ्यांचे कल्याणाची कामना केवळ हिंदू धर्म सांगतो, शस्त्र आणि शास्त्र हिंदू धर्मात दिसतात. पंच परिवर्तनातून सर्व समस्या सुटू शकतील. त्यामुळे नवा संकल्प करून जा. असे आवाहन अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे यांनी हिंदू संमेलनात केले. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संस्कार, सुरक्षिततेची भावना, मानसिक सक्षमता, सुखदुःखात सहभाग,एकोप्याची भावना निर्माण होते. स्त्रीत जी शक्ती आहे ती पुरुषात नाही. हिंदू संस्कृतीचे पिलर म्हणजे हिंदू संस्कृती होय. तिचा बिमोड करण्याचे जागतिक षडयंत्र मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. याबाबतचे चिंताजनक काव्य गायन आपल्या उद्बोधनात हेमांगी गाडगे यांनी केले.

हभप महंत कृष्णानंद भारती महाराज यांनी अध्यक्षीयउदबोधनातून करून एक राहाल तर, सुखी राहाल, हिंदूंनी जागृत होण्याची वेळ आली आहे. देश माझा, मी देशाचा ही भावना प्रत्येकाने अंगी बाणवावी. तत्व सोडू नये. संघाने शंभर वर्षे तप केले. फलस्वरूप विकास व प्रगतीकडे जलद गतीने वाटचाल आहे. असे उदगार काढले.

हिंदू संमेलनापूर्वी जुने राम मंदिरातून गावातील प्रमुख मार्गाने टाळ मृदंगाच्या तालावर निघालेल्या दिंडी दरम्यान मार्गातील छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हभप अनिकेत महाराज मोरे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. तर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिंदू संमेलनाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दानापूर उपखंड कार्यवाह संजय हागे यांनी केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!