ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध समित्यांची घोषणा.,नव्या कबड्डी पर्वाची मुहूर्तमेढ.
ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध समित्यांची घोषणा.,नव्या कबड्डी पर्वाची मुहूर्तमेढ.
ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध समित्यांची घोषणा.,नव्या कबड्डी पर्वाची मुहूर्तमेढ.

ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र (AKFM) संलग्न ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पुणे येथील साई चेंबर्स, वाकडेवाडी, शिवाजीनगर येथे उत्साहात पार पडली. राज्यभरातील कबड्डी क्षेत्रातील पदाधिकारी, प्रशिक्षक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत आगामी वर्षातील कबड्डी स्पर्धांचे नियोजन, खेळाडू विकास आणि संघटनात्मक बळकटीकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी पुनीत बालन होते. यावेळी चेअरमन सपना वाघमोडे, उपाध्यक्ष आमदार विवेक कोल्हे, विजय संतान, कल्याणकुमार गुजराथी, सचिव भारती जगताप, खजिनदार बाळासाहेब जाधव, सहसचिव ज्ञानेश काळे, गोकुळ तांदळे, अजय देशमुख, राजकुमार राऊत, सदस्य जगजीत खुराणा, अशोक देवकर, श्रीकांत पराडकर यांच्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
सभेमध्ये सन २०२६-२७ या वर्षात विविध गटांच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन व नियोजन, पंच व प्रशिक्षकांसाठी कार्यशाळा, खेळाडूंसाठी सराव शिबिरे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग, कबड्डी लीगचे आयोजन तसेच कबड्डी क्षेत्रात निपक्षपाती, भीतीमुक्त आणि उत्कृष्ट दर्जाचे कार्य सुनिश्चित करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली त्यामध्ये –
शिस्तपालन समिती :
चेअरमन विजय संतान (नांदेड), सचिव ज्ञानेश काळे (सातारा), सदस्य- गोकुळ तांदळे (छत्रपती संभाजीनगर), बाळासाहेब जाधव (नाशिक). –
तांत्रिक समिती :
चेअरमन – ज्ञानेश काळे (सातारा), सचिव अशोक देवकर (पुणे), सदस्य अशोक सरोदे (ठाणे), कलीम शेख (नाशिक), योगेश वाघ (धुळे).
पंचमंडळ समिती :
चेअरमन गोकुळ तांदळे (छत्रपती संभाजीनगर), सचिव संभाजी काळे (पुणे), सदस्य राजेंद्र बनसोडे (कोल्हापूर), गणेश म्हस्के (रायगड), सुधा ढवळे (पुणे).
निवड समिती :
सुनील जाधव पुरुष गटाचे चेअरमन (अहिल्यानगर), महिला गटाच्या चेअरमन सुधा ढवळे (पुणे).
छाननी समिती :
चेअरमन अजय देशमुख (जळगाव), सचिव – किरण गुंजाळ (नाशिक), सदस्य विशाल खंदारे (जालना).
क्रीडांगण समिती :
चेअरमन दादा देशमुख (नाशिक), सचिव-फिरोज पठाण (हिंगोली), सदस्य- अभिजीत तांदळे (बीड).
प्रसिद्धी समिती :
चेअरमन रामा रणदिवे (पुणे), सचिव दत्तात्रय मारकड (सिंधुदुर्ग), सदस्य फिरोज मुलानी (सांगली), विजय मोरे (नाशिक).

यावेळी पुनीत बालन यांनी सर्व समिती पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित अध्यक्ष, सचिव आणि प्रतिनिधींना अधिकृत किटचे वितरण करून आगामी “नव्या कबड्डी पर्वासाठी” शुभेच्छा दिल्या. राज्यातील कबड्डी खेळाच्या प्रचार-प्रसारासह खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.