साहेबांच्या क्रिकेट खेळाला राजाश्रय आहे त्याप्रमाणे मातीतल्या कबड्डी खेळाला राजाश्रय आवश्यक…केशवराव पातोंड बेलखेड येथे आयोजित पाच दिवशीय कबड्डी सराव शिबीराचा समारोप.
साहेबांच्या क्रिकेट खेळाला राजाश्रय आहे त्याप्रमाणे मातीतल्या कबड्डी खेळाला राजाश्रय आवश्यक...केशवराव पातोंड बेलखेड येथे आयोजित पाच दिवशीय कबड्डी सराव शिबीराचा समारोप.
साहेबांच्या क्रिकेट खेळाला राजाश्रय आहे त्याप्रमाणे मातीतल्या कबड्डी खेळाला राजाश्रय आवश्यक…केशवराव पातोंड
बेलखेड येथे आयोजित पाच दिवशीय कबड्डी सराव शिबीराचा समारोप.

तेल्हारा – दि.
कबड्डी हा ग्रामीण भागातील लाल मातीतील मर्दानी खेळ आहे खेळाचे महत्त्व ग्रामीण भागासह शहरात सुद्धा पोहचले असून प्रो कबड्डी मॅट वर खेळल्या जात आहे परंतु साहेबांचा खेळ क्रिकेट ला जे महत्त्व आहे जो राजाश्रय मिळत आहे ते लाल मातीच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळाले नाही अजूनही ग्रामीण भागात दर्जेदार खेळाडू असले तरी त्यांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. गावा गावातील संघ यामुळे कमी होत आहेत काही गावात संघ आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत त्यांना सुविधा उपलब्ध नसल्याने ते राज्यस्तरावर पोहचू शकत नाहीत शासनस्तरावर या सर्व बाबींचा विचार व्हावा असे प्रतिपादन अकोला महानगर हौसी असोसिएशन चे अध्यक्ष केशवराव पातोंड, सचिव वासुदेवराव नेरकर यांनी केले.
श्री हनुमान मंडळाने आयोजित पाच दिवशीय कबड्डी संघ सराव शिबीराचे समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष केशवराव पातोंड, वासुदेवराव नेरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन उंबरकर, सोसायटी अध्यक्ष दिनेश नागपूरे,माजी खेळाडू रामभाऊ भास्कर, माजी सरपंच नंदकिशोर उंबरकर, माजी उपसरपंच नंदकिशोर निमकर्डे,हनुमान मंडळाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, सचिव बंडू भाऊ खुमकर, संचालक तथा मा उपसरपंच सत्यशील सावरकर, खरेदी विक्री उपाध्यक्ष राजु टोहरे, मुख्याध्यापक घाटोळ सर,अरविंद वरठे, सुरेश इंगळे,जुनेद शाह, जावेद शाह, गणेश अढाऊ, ज्ञानेश्वर इंगळे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गोमासे सर यांनी तर आभार मंडळाचे खेळाडू संतोष चोपडे यांनी केले. कार्यक्रमाला आजी माजी खेळाडू यांची उपस्थिती आवर्जून होती.

यावेळी असोसिएशन अध्यक्ष केशवराव पातोंड यांचा सत्कार हनुमान मंडळाचे सचिव बंडू भाऊ खुमकर यांनी तर कबड्डी खेळासाठी सातत्याने 35 वर्षापासून सेवाव्रत व्यक्तीमत्व असोसिएशन चे सचिव वासुदेवराव नेरकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार हनुमान मंडळाचे संचालक सत्यशील प्र. सावरकर यांनी केला तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा मंडळाचे खेळाडू यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुमसर भंडारा जिल्हा येथे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत निवड झालेल्या संघात अकोला जिल्हा कडून कर्णधार अर्जुन तंवर, प्रफुल्ल घोपे, प्रतिक कात्रे, प्रणव खुमकर, शुभम वाघ, शुभम पातोंड, सुरज पवार, गौरव इंगळे, अंकित राऊत, सौरव मारसकोल्हे, निखिल खुमकर, गणेश इंगळे, राघव पांडे, अभिजीत तायडे, व्यवस्थापक जुनेद शाह, प्रशिक्षक प्रशांत डिगे यांची निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशन व हनुमान मंडळाचे वतीने सर्व संघाचे स्वागत करण्यात येवून विजयासाठी शुभकामना दिल्या.
तसेच माऊली धांडे येथे नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान संघ बेलखेड यांनी 65 किलो व 57 किलो दुसरा क्रमांक पटकवला त्यामधील खेळाडू, प्रशिक्षक जुनेद शाह,मयूर उमाळे,मयूर गोमासे,भावेश राखोडे,तेजस घाटे, तुषार गोमासे, अभिषेक गोमाशे, सुमित वानखडे, अनिकेत वानखडे, रोहित राऊत, विनीत परमाळे, मनीष गोमासे, इंद्रजित मानकर, ओम वानखडे, समर्थ काळपांडे या सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार असोसिएशन चे वतीने करण्यात आला.