आपला जिल्हा अकोलाक्रीडा

सातव गुरूजी चे संघ बेलखेड चे दर्यावर्ती संघ, जय हिंद संघ. 

सातव गुरूजी चे संघ बेलखेड चे दर्यावर्ती संघ, जय हिंद संघ. 

सातव गुरूजी चे संघ बेलखेड चे दर्यावर्ती संघ, जय हिंद संघ.


बेलखेड चे कबड्डी संघ… दर्यावर्ती कबड्डी संघ – जय हिंद कबड्डी संघ या दोन्ही संघाच्या काट्याची लढतीत बरेच वेळा आम्ही खेळलो… ज्या ज्या वेळी या दोन्ही संघात लढत व्हायची सातव गुरूजी तटस्थ भूमिका घ्यायचे आणि नेहमी म्हणायचे लढा निकराने एका संघाला हारायचे आहे…तसेही बेलखेड लाच जिंकायचे आहे… सातव गुरूजी यांनी आपल्या परिसरासह तालुक्यात, अकोला,बुलढाणा जिल्ह्यात कबड्डी पंच म्हणून खुले सामने, फेडरेशन चे सामन्यामध्ये पंच म्हणून काम केले ते कोणताही दुजाभाव, भेदभाव न करता… बेलखेड चे दोन्ही संघ बाहेर गावी सातव गुरूजी चे संघ असत… सातव गुरूजी नेहमी जय हिंद संघा सोबत गावातून यायचे परंतु नंतर मात्र दुसऱ्या गावात दोन्ही संघाची काळजीपूर्वक विचारपूस करून फायनल बेलखेड ने मारण्यासाठी लढा हि हिमंत द्यायचे…एक प्रसंग आठवतो सातव गुरूजी अम्पायरशिप करीत होते… जय हिंद विरुद्ध दुसऱ्या गावची लढत होती… निर्णय चुकला म्हणून गुरूजी यांचे वर दबाव वाढला त्यातील एक मनुष्य (नाव माहीती आहे मुद्दाम टाळले) सातव गुरूजी यांच्या अंगावर गेला… जय हिंद संघ मैदानात होता ते बोलले नाहीत… आम्ही दर्यावर्ती संघाचे खेळाडू म्हणून तेथे सर्व होतो… सातव गुरूजी यांच्या अंगावर जाताच बालमुकुंद सह आम्ही दर्यावर्ती संघ पुढे होवून प्रतिकार केला त्यावेळी सातव गुरूजी यांना जो धीर मिळाला ती पंचगिरी करण्याची हिमंत मिळाली ती ते नेहमी बोलून दाखवित… त्यानंतर कोणत्याही गावात कधीच सातव गुरूजींना असा प्रसंग समोर आला नाही… सातव गुरूजी नेहमी चाणाक्ष, तिष्ण नजरेत पंचगिरी करित होते एखादे वेळी घाईघाईने निर्णय चुकला तर तो भरून काढून दोन्ही संघात समतोल राखण्याची कसब गुरूजींनी ठेवली म्हणूनच सातव गुरूजी यांना खेळाडूंच्या रोषाला समोर जायची वेळ येत नव्हती… कबड्डी…सामने म्हणजे सातव गुरूजी पंच ठरले असायचे… शालीग्राम सातव गुरूजी जिल्हा परिषद शिक्षक…शनिवारी शाळा करून शनिवार रविवार कबड्डी पंच हे समीकरण ठरले होते… गुरूजी च्या घरच्यांना सुद्धा ही दिनचर्या माहिती होती… कधी कुजबुज नाही… सातव गुरूजी पंच म्हणून हजर…जवळचे गावात पायदळ किंवा सायकल ने तर जेथे एसटी तेथे एसटी ने गुरूजी पंच म्हणून हजर… मुलांचे गुरूजी म्हणून शाळेत, कबड्डी चे पंच म्हणून सदैव निष्ठेने काम करणारे सातव गुरूजी यांच्या निधनाने असे शाळेचे मास्तर व कबड्डी चे पंच दुरापास्तच…
निधन – 5/6/2026
अंत्यसंस्कार – 6/6/2026
*भावपूर्ण श्रद्धांजली…शालीग्राम सातव गुरूजी…🙏*
… ️✍️सत्यशील प्र सावरकर
दर्यावर्ती कबड्डी संघ बेलखेड
मा उपसरपंच बेलखेड
पत्रकार तेल्हारा तालुका

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!