प्रमिलाताई राऊत (वानखडे) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. उपक्रमशील कार्याची घेतली गेली दखल.
प्रमिलाताई राऊत (वानखडे) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. उपक्रमशील कार्याची घेतली गेली दखल.
प्रमिलाताई राऊत (वानखडे) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
उपक्रमशील कार्याची घेतली गेली दखल.

तेल्हारा –
प्रबोधन काॅलनी,संत सावता नगर तेल्हारा येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रमिलाताई राऊत वानखडे यांना जिल्हा परिषद अकोला कडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.
जि. प. प्राथमिक शाळा वाडी अदमपूर पंचायत समिती तेल्हारा येथे प्रभारी मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रमिलाताई वानखडे यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाळेमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबविले जसे निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा सह मुलांमध्ये प्रबोधनात्मक जागृती निर्माण करून अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या या व इतर उपक्रमशील कार्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांचे कडून त्यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी, मान्यवर मंडळी उपस्थित होते. आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमिलाताई वानखडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय राबविलेल्या उपक्रम दरम्यान सहकार्य करणारे सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तथा आपल्या परिवारासह मित्रांना दिले आहे.