तब्बल 29 वर्षांनी विद्यार्थी भेटले एकमेकांना. सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथील विद्यार्थी स्नेह भेट संमेलन संपन्न.
तब्बल 29 वर्षांनी विद्यार्थी भेटले एकमेकांना. सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथील विद्यार्थी स्नेह भेट संमेलन संपन्न.
तब्बल 29 वर्षांनी विद्यार्थी भेटले एकमेकांना.
सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथील विद्यार्थी स्नेह भेट संमेलन संपन्न.
तेल्हारा – दि. 24
धकाधकीच्या जिवनात साधे कोणाला दोन मिनीटे बोलण्या साठी वेळ नाही पण मैत्रीसाठी सर्व काही असे विचार ठेवून सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथील 1996-97 साली दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी चक्क 29 वर्षांनंतर एकत्र येऊन मैत्रीभेटाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा चा शताब्दी महोत्सव निमित्ताने दिनांक 24 आक्टोबर रोजी स्नेह भेट सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
आपण ज्या शाळेत शिकलो ते विद्यालय शताब्दी वर्ष साजरे करीत आहे त्याचा एक भाग आपण सर्वांनी मिळून स्नेह भेट संमेलन व शिक्षकांचा सत्कार करावा असे ठरले त्यानुसार कार्यक्रम आयोजित केला.
यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दिवाळीनिमित्त शिक्षकांची ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थी यांनी आप आपले शालेय जीवनापासून चे अनुभव व काही चांगले वाईट घटनाचा उहापोह केला. विद्यार्थी दशेत जो आनंद घेता येतो तो जीवनात आनंद घेता येत नाही असा संदेश अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दिला.
यावेळी सेठ बन्सीधर विद्यालयाचे संचालक मंडळ, आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते, दरम्यान खारोडे सर, देशमुख मॅडम, वाघ सर यांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर विविध उपक्रम राबवले गेले. दिवाळी स्नेह भोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एकंदरीत दिवसभर जुन्या मित्रांसोबत आनंदाने दिवस गेला असल्याने असा प्रकारे स्नेह भेट संमेलन दरवर्षी घेतले जावे अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आली.