आपला जिल्हा

भिमराव परघरमोल, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित., जिल्हा परिषद बुलढाणा कडून मानाचा पुरस्कार. 

भिमराव परघरमोल, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित., जिल्हा परिषद बुलढाणा कडून मानाचा पुरस्कार. 

भिमराव परघरमोल, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित., जिल्हा परिषद बुलढाणा कडून मानाचा पुरस्कार.

तेल्हारा प्रतिनिधी (दि. १६ ऑक्टो. २०२५)
शिवनगर, तेल्हारा येथे वास्तव्यास असणारे भिमराव परघरमोल यांना जिल्हा परिषद बुलढाणा कडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.
जि. प.उच्च प्राथमिक शाळा उकळी बु. ता. संग्रामपुर जि. बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असणारे भिमराव परघरमोल यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेमधील त्यांचे विविध उपक्रम, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, तसेच मुलांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी ते अनेक उपक्रम राबवतात. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला बराच हातभार लागतो. तसेच ते संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानासह महापुरुषांच्या जीवनावर व्याख्यान करतात. नामांकित वृत्तपत्रांमधील विविध विषयावर त्यांचे लेखन, प्रकाशित झालेली पुस्तके, वाढवलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इत्यादींची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचेकडून त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड (बुलढाणा विधानसभा मतदारसंघ) तथा गुलाब खरात (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा) अतिरिक्त व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तथा सर्व खात्यांचे प्रमुख इत्यादींची विचारपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला मंत्री महोदय उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांनी आपापला शुभेच्छा संदेश पाठवून सभेला संबोधित केले. भिमराव परघरमोल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तथा आपल्या परिवारासह मित्रांना देतात.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!