कासोद-शिवपुर शिवारातून अतिक्रमणमुक्त शेतरस्ते मोहिमेला प्रारंभ., छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून अकोट तालुक्यातील शेतरस्त्यांची पाहणी सुरू
कासोद-शिवपुर शिवारातून अतिक्रमणमुक्त शेतरस्ते मोहिमेला प्रारंभ., छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून अकोट तालुक्यातील शेतरस्त्यांची पाहणी सुरू
कासोद-शिवपुर शिवारातून अतिक्रमणमुक्त शेतरस्ते मोहिमेला प्रारंभ., छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून अकोट तालुक्यातील शेतरस्त्यांची पाहणी.

अकोट तालुक्यातील कासोद-शिवपुर ग्रामस्थांच्या उपस्थितीत महसूल विभागाने अतिक्रमणमुक्त शेतरस्त्यांची मोहीम सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते कायमस्वरूपी नोंदविण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
कासोद-शिवपुर शिवारात आज विशेष पाहणी फेरी घेण्यात आली. नकाशावर असलेले रस्ते आणि नकाशावर नसलेले रस्ते परंतु वापरात असलेले रस्ते पाहणी करण्यात आले
या पाहणी फेरीत नायब तहसीलदार सुभाष सावंग, मंडळ अधिकारी पी. ए. होपळ, ग्रामसेवक अनंत मोहोकार, शिवपुर ग्राम महसूल अधिकारी राजाभाऊ खामकर, राहणापूर ग्राम महसूल अधिकारी जयश्री धवने, बोर्डी ग्राम महसूल अधिकारी के. डी. पवार, पोलिस पाटील विजय पाटील खवले, कोतवाल पवन गावंडे, निकिता तायडे, हर्षवर्धन, शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे सतिश बोंद्रे, कृषिसहायक रामकृष्ण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सरपंच मायाताई महाले, उपसरपंच उज्वलाताई सुरत्ने, तसेच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रामस्थांमधून गजानन बोंद्रे, नंदकिशोर बोंद्रे, प्रभूदास ताराम, गोपाल ताराम, सिद्धेश्वर आंधळे, रामा सहारे, शादुल्ला शेख, मनोहर सोलकर, वामनराव बोंद्रे, राजू सहारे, दिपक ताराम, नियजोद्दीन शेख, गजानन गडगोळे, दिनकर महाले, विठ्ठल शिंगणे, श्रीधर कोहरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.
या मोहिमेत शेतरस्त्यांचे सर्वेक्षण, वाजिब उल अर्ज अथवा निस्तार पत्रकात नसलेल्या मार्गांची नोंद, शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र मिळवणे, रस्ता अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावणे, तसेच रस्त्यांची मोजणी व सीमांकन यासारखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या दरम्यान शिवारातील १६ रस्त्यांची पाहणी करण्यात आली.