बेलखेड कोठा रायखेड दानापूर शेत पाणंदरस्ता मोजणी मोहिमेला सुरूवात. तिन किलोमीटर रस्ता मोजणीचा पहिला टप्पा.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून तेल्हारा तालुक्यातील शेतरस्त्यांची पाहणी मोहिमेला सुरूवात करण्यात आली.
बेलखेड कोठा रायखेड दानापूर शेत पाणंदरस्ता मोजणी मोहिमेला सुरूवात.
तिन किलोमीटर रस्ता मोजणीचा पहिला टप्पा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून तेल्हारा तालुक्यातील शेतरस्त्यांची पाहणी मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांचे मार्गदर्शन खाली मंडळ अधिकारी संजय साळवे यांचे देखरेखीखाली बेलखेड ग्रामस्थांच्या उपस्थितीत महसूल विभागाने अतिक्रमणमुक्त शेतरस्त्यांची मोहीम सुरू केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते कायमस्वरूपी नोंदविण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
बेलखेड शिवारात आज मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात बेलखेड कोठा रायखेड दानापूर रस्ता पाहणी करून 3 किलोमीटर रस्ता मोजणी करण्यात आली. तसेच नकाशावर असलेले रस्ते आणि नकाशावर नसलेले रस्ते परंतु वापरात असलेले रस्ते सुद्धा पाहणी करण्यात आले.
या दरम्यान तहसीलदार समाधान सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार राणे साहेब, मंडळ अधिकारी संजय साळवे यांचे देखरेखीत बेलखेड येथे मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी ग्राम बेलखेड महसूल अधिकारी संदीप ढोक,कोठा चवरे, ग्रामविकास अधिकारी बेलखेड कासदे,तालुका भूमी अभिलेख चे एम. एस. धुर्वे, एस. एस. पळसपगार या कामी कार्यरत होते. गावातील प्रतिष्ठित नागरीक तथा पादंण रस्ता शेतकरी गजानन उंबरकर,अतुल गोमासे,पत्रकार सत्यशील प्र सावरकर, गणेश सोनटक्के दिपक टोहरे, वैभव अरूडकर,विनोद भोपळे, अशोक येनकर, सुरेश इंगळे,ज्ञानेश्वर बोबडे, प्रमोद भड,ब्रम्हदेव जाधव, शुभम येनकर,प्रशांत खुमकर, राजेश सुशिर,योगेश तायडे, गोविंद नागपूरे,अंकीत काळपांडे,राजु परमाळे,संतोष भोपळे, विनोद उमाळे,निलेश सुशिर, संतोष भड इत्यादींनी पुढाकार घेतला आहे.