आपला जिल्हा

शासकीय धान्य गोदाम येथे ज्वारी खरेदीचा शुभारंभ

शेतकऱ्यांनी शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीस आणावी,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले.


अकोला, दि.२१ : पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत जिल्ह्यात ज्वारी खरेदीचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीस आणावी,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले.

शासकीय धान्य गोदाम येथे ज्वारी खरेदीचा शुभारंभ दि. २० मे रोजी जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसिलदार महेंद्रकुमार आत्राम, जिल्हा पणन कार्यालयाचे श्री. सरप, तालुका खरेदी विक्री संघ व्यवस्थापक दिलीप काळमेघ, तालुका खरेदी विक्री संघ केंद्रप्रमुख निरंजन काठोळे, पुरवठा निरीक्षक (शहर) रामेश्वर भोपळे, गोदाम व्यवस्थापक तुषार चिंचोले, पुरुषोत्तम साखरे उपस्थित होते.
ज्वारी खरेदी केंद्रावर शेतकरी द्वारकानाथ चिलवंते यांचा नायब तहसिलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!