महाराष्ट्र राज्याची ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी बारमाही व गुणवत्तापूर्ण शेत/ पांदन रस्ते तयार करण्यासाठी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनाला मुर्त रूप देण्यासाठी समग्र योजना तयार करण्यासाठी गठीत समितीची बैठक मंत्रालयात झाली संपन्न.
गठीत समितीच्या सदस्यपदी अकोला आमदार रणधीर सावरकर यांची नेमणूक.
महाराष्ट्र राज्याची ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी बारमाही व गुणवत्तापूर्ण शेत/ पांदन रस्ते तयार करण्यासाठी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनाला मुर्त रूप देण्यासाठी समग्र योजना तयार करण्यासाठी गठीत समितीची बैठक मंत्रालयात झाली संपन्न.
गठीत समितीच्या सदस्यपदी अकोला आमदार रणधीर सावरकर यांची नेमणूक.

शेतक-यांच्या समग्र विकासाला केंद्रस्थानी ठेवताना महायुती शासनाने राज्यातील संपूर्ण शेत / पांदन रस्ते विकासासाठी महत्वाकांक्षी योजना तयार करण्यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेत/ पांदन रस्ते मजबुतीकरणा संदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय दि.1 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या महसूल व वन विभागाने निर्गिवमत केला असून सदर समितीची पहिली महत्वपूर्ण बैठक मा.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. सदर गठीत समितीच्या सदस्यपदी आमदार रणधीर सावरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील शेतक-यांसाठी शेतामध्ये पेरणी, कापणी, मशागत, मळणी तसेच शेतामध्ये उत्पादीत माल बाजारपेठेत पोहचविण्यासाठी बारमाही रस्ते अत्यंत आवश्यक आहेत. याकरीता 2025 च्या पावसाळी अधिवेशनात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत/पांदन रस्ते मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल असे राज्यातील जनतेला आश्वस्त करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक संपन्न झाली. राज्यात शेत / पांदन रस्ते तयार करण्यासाठी अनेक योजना रोहियो योजने अंतर्गत राबविण्यता आल्या परंतु अपेक्षित साध्य गाठता आले नसल्याने या संबंधीत असलेल्या योजनांची पुनर्रचना करण्यासाठी राज्याचा आराखडा तयार करण्यावर समितीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. शेत / पांदन रस्ते विकास करण्यासाठी यापूर्वी राबविण्यता आलेल्या सर्व योजनांचा योजनानिहाय तपशील आमदार सावरकर यांनी बैठकीत विषद केला. विद्यमान योजनांमधील त्रुटी तसेच भविष्यात तयार करावयाची योजना सक्षम करण्याकरीता आवश्यक सुचना तसेच निधीची उपलब्धता आदींसह योजना राबविण्यासाठी उभारावयाची यंत्रणा या सर्व बाबींची मांडणी करताना योजनेसाठी गाववार नकाशे तयार करून गावनिहाय आराखडा तयार करावा, तसेच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे तयार करावे, रस्त्याच्या दुतर्फा नाल्या तयार करून वृक्ष लागवड करावी यासह प्रस्तावित योजनेचे स्वरूप कसे असावे याबाबत केलेल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाच्या दस्तएवजाची धारीका समिती अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह, मंत्री रोहयो, मा.भरत गोगावले, मंत्री ग्रामविकास, मा.जयकुमार गोरे, राज्यमंत्री मा.आशिष जयस्वाल यांना सादर केली. राज्यातील शेत / पांदन रस्ते तयार करण्याकरीता आजपर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्व योजनांचा आढावा घेऊन पुढे भविष्यात सदर रस्ते विकासासाठी एकच परिपूर्ण योजना असावी यावर समितीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच योजना तयार करण्याकरीता अभ्यासगट नेमूण त्या अभ्यासगटाने समितीला सुचना कराव्यात असे निर्देश समिती अध्यक्षांनी यावेळी दिले.