रक्षाबंधन निःस्वार्थ प्रेम, एकता आणि पवित्रतेचा उत्सव-बीके रुख्मिणी दीदीजी.
अकोला-वाशीम ब्रम्हाकुमारीज प्रमुख राजयोगी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदीजी व ब्रह्माकुमारी सुमन दीदीजी यांची विशेष उपस्थिती.
रक्षाबंधन निःस्वार्थ प्रेम, एकता आणि पवित्रतेचा उत्सव-बीके रुख्मिणी दीदीजी.
अकोला-वाशीम ब्रम्हाकुमारीज प्रमुख राजयोगी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदीजी व ब्रह्माकुमारी सुमन दीदीजी यांची विशेष उपस्थिती.

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा येथे 3 ऑगस्ट च्या सायंकाळी संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शखाली रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.
अकोला-वाशीम ब्रम्हाकुमारीज प्रमुख राजयोगी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदीजी व ब्रह्माकुमारी सुमन दीदीजी यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.रुख्मिणी दीदींनी उपस्थित भाऊ बहिणींना रक्षाबंधनाचे आध्यत्मिक महत्व व रहस्य सांगितले. रक्षाबंधन हा निःस्वार्थ प्रेम, एकता, पवित्रता आणि परिवर्तन याची स्मुर्ती व साक्ष देणारा भारतातील मोठा उत्सव आहे. बहिणीने भावाला रक्षा सुत बांधून पवित्र नात्याला व विश्वासाला जोपसण्याचे अभिवचन दिले जाते.


तसेच आत्मिक स्वरूपाने विचार केल्यास सृष्टीतील सर्व मनुष्य एकाच परमात्म्याची मुलं आहेत त्यामुळे भाऊ भाऊ आणि बहीण भाऊ या नात्याने त्यांना एकाच विचाराने बांधून ठेवण्याचे श्रेष्ठ कार्य रक्षाबंधन निमित्त केले जाते.राखी बांधण्यापूर्वी स्मुर्ती चा तिलक लावून आपण देविदेवता असल्याची स्मुर्ती दिली जाते आणि त्यादिशेने परिवर्तन होण्यासाठी ब्रह्माकुमारीज राजयोग प्रत्येक मनुष्याला समजवीण्याची सेवा करीत आहे.ब्रह्माकुमारीज परिवार हा समाज उन्नतीसाठी प्रेरक असून आपण तशी स्मुर्ती ठेवावी असे मनोगत रुख्मिणी दीदींनी व्यक्त केले.


ब्रह्मा कुमारीज मुख्यालय माउंट अबू राजस्थान म्हणजे मधुबन वरून सर्वांसाठी आलेली राखी प्रदर्शित करून ईश्वरीय संदेशाचे वाचन केले.संचालिका प्रमिला दीदींनी स्मुर्ती तिलक लावून आदरणीय रुख्मिणी दीदींच्या हस्ते सर्वाना राखी बांधून सुमन दीदींच्या हस्ते टोली वाटण्यात आली. प्रसंगी तेल्हारा सेवा केंद्र व गीता पाठशाळेचे भाऊ बहिणी मोठया संख्येने उपस्थित होते.