‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद’ नावाची योजनाच नाही.
महिला व बालविकास अधिकारी यांचे स्पष्टीकरण.
‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद’ नावाची योजनाच नाही.
महिला व बालविकास अधिकारी यांचे स्पष्टीकरण.
अकोला, दि. २५ : मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’ अशा योजनेच्या नावाने समाजमाध्यमांतून काही संदेश प्रसारित होत आहेत. प्रत्यक्षात या नावाची कुठलीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले.
सध्या सोशल मीडियावरून ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद’ नावे योजना असून, 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 2 मुलांस बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा 4 हजार रुपये मिळणारआहेत व याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत’ अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून सदर बाब अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत सावध असावे. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांबाबत माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे.