तेल्हारा येथील जुने शहरवाशी कावळधारी मंडळाच्या शिवभक्तांची श्रद्धेची ३१ भरण्यांची कावड यात्रा त्र्यंबकेश्वरला प्रस्थान.
६० हून अधिक शिवभक्तांचा पंधरादिवसीय पायी प्रवास त्र्यंबकेश्वर येथून सोमवार पासून भक्तिभावात होणार सुरू.
तेल्हारा येथील जुने शहरवाशी कावळधारी मंडळाच्या
शिवभक्तांची श्रद्धेची ३१ भरण्यांची कावड यात्रा त्र्यंबकेश्वरला प्रस्थान.
६० हून अधिक शिवभक्तांचा पंधरादिवसीय पायी प्रवास त्र्यंबकेश्वर येथून सोमवार पासून भक्तिभावात होणार सुरू.

तेल्हारा दि :- हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आणि अखंड श्रद्धेचा भाग बनलेली कावड यात्रा ही संपूर्ण भारतभर विशेषतः श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. याच परंपरेला अनुसरत, तेल्हारा जुने शहर वाशी येथील शिवभक्तांचा भव्य कावड ताफा शनिवारी, दि .२६ जुलै रोजी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे गोदावरीचे पवित्र गंगाजल भरून आणण्याकरिता शहरातून ढोल ताशांच्या गजरात ३१ भरण्याची भव्य शोभायात्रा काढून प्रस्थान केले .या जुने शहर वाशी भव्य कावड यात्रेत सहभागी ६३ हून अधिक शिवभक्त त्रंबकेश्वर ते तेल्हारा या पंधरा दिवसांचा पायी प्रवास करत गौतमेश्वर तेल्हारा येथे येणार असून, येथे गंगाजलाने भगवान गौतमेश्वर महादेवाचा जलाभिषेक केला जाणार आहे. ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचं प्रतीक मानली जाते. या कावड यात्रेत जुने शहरवाशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

यात्रेची वैशिष्ट्ये व आयोजन:
* या यात्रेसाठी शिवभक्तांनी ३१ भरण्याची खास कावड तयार केली असून परतीच्या प्रवासात त्यात त्रंबकेश्वर येथील पवित्र गोदावरीचे गंगाजल ठेवल्या जाणार आहे ..
* प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा ऐहिक सुखसंग्रह नाही — शिवभक्त साधेपणाने चालत जातात, उपवास करतात व भजन/ हर हर महादेवांच्या गर्जना करतात..
* स्थानिक ग्रामस्थ, शिवभक्त , सामाजिक संस्था, आणि स्वयंसेवक मंडळांकडून स्वागत व भोजन व्यवस्था केली जाते.
* यात्रेदरम्यान शिस्त, स्वच्छता आणि भक्तीभावाचे दर्शन घडते.

गौतमेश्वरचे स्थानिक महत्त्व:..
गौतमेश्वर हे तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध शिवस्थळ असून येथे दरवर्षी श्रावण महिन्यात गौतमेश्वर महादेवाची विशेष पूजा व जलाभिषेक केला जातो. कावड यात्रा ही त्या परंपरेचा एक अनिवार्य भाग बनली आहे.

मागील वर्षी ओंकारेश्वर ते तेल्हारा निघाली होती कावड यात्रा…
जुने शहर वाशी मंडळाकडून मागील वर्षी ओंकारेश्वर ते तेल्हारा निघाली होती कावड यात्रा ही कावड यात्रा श्रद्धेचा आणि शिस्तीचा अनुपम संगम असून, शिवभक्ती, सामाजिक ऐक्य आणि ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारी यात्रा ठरत आहे.त्र्यंबकेश्वर ते गौतमेश्वर हा प्रवास केवळ अंतराचा नाही तर आत्मिक उन्नतीचा प्रवास आहे — असाच संदेश या शिवभक्तांनी दिला आहे.
कावड यात्रेचे धार्मिक महत्त्व…
कावड यात्रा ही मुख्यतः श्रावण महिन्यात (शिवाचा अत्यंत प्रिय महिना) पायी चालत नदी/तीर्थक्षेत्रातून पवित्र जल भरून शिवमंदिरात अभिषेक करण्याची एक श्रद्धायात्रा असते.
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनावेळी निघालेलं विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांची देहकांती तापली. त्यांच्या तापशमनासाठी गंगाजल अर्पण केल्याने ते शांत झाले. म्हणूनच भक्त गंगाजल भरून शिवलिंगावर अर्पण करतात.