तेल्हारा बस आगाराची इंदोर, पुणे, नाशिक, जळगाव खान्देश,खामगाव, वाशिम या ठिकाणी बसेस सुरू करावी.
श्री साई उत्सव परिवार व तेल्हारा जनतेची मागणी.
तेल्हारा बस आगाराची इंदोर, पुणे, नाशिक, जळगाव खान्देश,खामगाव, वाशिम या ठिकाणी बसेस सुरू करावी.
श्री साई उत्सव परिवार व तेल्हारा जनतेची मागणी.

तेल्हारा बस आगारातून इंदोर,पुणे, नाशिक, जळगाव खान्देश, वाशिम, खामगाव येथे जाणे येणे साठी बसेस सुरू करण्यात याव्या यासाठी श्री साई उत्सव परिवार व तेल्हारा जनतेच्या वतीने तेल्हारा बस आगार प्रमुख मिथुन शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात सविस्तर मागणी करताना म्हटले आहे की,तेल्हारा बस आगाराची इंदोर, पुणे, नाशिक, जळगाव खान्देश,खामगाव, वाशिम या ठिकाणी बसेस सुरू करून संबधित शहरास जोडलेल्या जनतेला सोयीस्कर व्हावे, विद्यार्थी साठी सुविधा होईल व व्यापारी वर्ग याचा व्यापार वाढून तेल्हारा प्रगत होईल व जनतेला या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी वाहतूक वापरण्याचं आर्थिक भुर्दंड न लागावा या सर्व बाबींचा विचार आगार प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक यांनी निवेदन स्वीकारले व वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून लवकर बसेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले परंतु सध्या तेल्हारा आगार येथील कार्यरत कर्मचारी संख्या कमी असल्याने नवीन ठिकाणी बसेस सुरू करण्यात अडचण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर निवेदन देताना साई उत्सव परिवार तर्फे पुरण अग्रवाल , आनंद मुलचंद राठी, राजेश पालीवाल, निलेश ईश्वरदास राठी व जनतेतर्फे ॲड पवन शर्मा, आनंद पाडिया व शेख अहमद शेख उस्मान (पुंडा भाई) इत्यादी उपस्थित होते.