आपला जिल्हा

माऊली मल्टिस्टेटच्या वतीने भाविकांना उपवासाचे फराळ वाटप.

आषाढी एकादशीचे औचित्य.

माऊली मल्टिस्टेटच्या वतीने भाविकांना उपवासाचे फराळ वाटप.
आषाढी एकादशीचे औचित्य.

माऊली मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी नाशिक शाखा तेल्हारा च्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधुन भाविकांना उपवासाचे फराळ वाटपाचा कार्यक्रम 6 जुलै रोजी संस्थेच्या तेल्हारा शाखेत पार पडला.
यावेळी संस्थेचे सर्वेसर्वा,वाडी अदमपुरचे मा. सरपंच, वाडी अदमपुर सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष संस्थेचे ठेविदार पर्वतराव पंढरी वाघ, संस्थेचे अध्यक्ष पवन पर्वतराव वाघ, संस्थेचे संचालक अनंत अहेरकर, कु छबी पवन वाध,जेष्ठ पत्रकार सुरेश शिगणारे, सेवा निवृत शिक्षक, चंद्रप्रकाश ठोसर सर, गंगाधर खोडे सर, शंकरराव कोठे सर, यांच्या हस्ते माऊली च्या प्रतिमेचे पुजन, आरती करण्यात आली.

माऊली मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा कारभार अतिशय उत्तम रितीने असून ठेवीदार व कर्जदारांचा उत्तम प्रतिसाद दिसत आहे.
ठेवीदारांना परवडणारे ठेवीवरील व्याजदर, त्याच प्रमाणे आवश्यक तेवढ्या ठेवी संस्थेकडे असुन संस्थेचा कारभार पारदर्शक सुरु असुन संस्थेचे अध्यक्ष, संचालक,यांच्या कडून ग्राहकांना सेवा कशी तत्परतेने मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष असते, कर्मचाऱ्यां कडून ही खातेदार, ठेवीदारांना चांगली सेवा प्रदान केली जात असल्याचे यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संस्थेचे ठेवीदार, खातेदार चंद्रप्रकाश ठोसर सर इतर मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच संस्थेच्या एकंदरीत प्रगती चा अहवाल उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी किसनराव आमले, सारंगधर फोकमारे अनिल फोकमारे, राहुल फोकमारे, दिपक फोकमारे, शाखाधिकारी सोपान कडु, कर्मचारी योगेश मानकर, प्रणव अहेरकर, पुनम तायडे, अतुल गुहाळ आदी ची उपस्थिती होती. संस्थेला तेल्हारा शहरातील, तालुक्यातील विविध बॅकेच्या अधिकारी कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक,आमंत्रित तसेच ठेवीदार ,कर्जदार यांनी भेटी देऊन उपवासाचे फराळाचा लाभ घेतला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!