सेवानिवृत्ती सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप.
चंद्रप्रकाश सरोदे यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार.
सेवानिवृत्ती सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप.
चंद्रप्रकाश सरोदे यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार.

श्रीगाडगे बाबा यांच्या हस्ते 1952 मध्ये स्थापन केलेल्या श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळ मुर्तिजापूर संलग्नित प्रतिभा विद्यालय शिवण तालुका कारंजा जिल्हा वाशीम येथे कार्यरत शिक्षक, मुळ गाव मुर्तिजापूर तालुक्यातील नागोली येथील चंद्रप्रकाश(चंदू)विठ्ठलराव सरोदे यांची सेवानिवृत्त नुकतीच झाली त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात सरोदे यांनी विद्यालय व शिकविलेल्या विद्यार्थी प्रति आपले प्रेम जिव्हाळा कायम रहावा, आठवणीत रहावे असे कृतीशील काम सेवानिवृत्ती सोहळ्यात केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून बाहेरील गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले. सेवानिवृत्ती सोहळ्यात सेवापृत्ती म्हणून चंदू सरोदे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप करून दाखविलेल्या आपल्या चांगुलपणाचा, औदयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संस्थेचे वतीने प्रतिभा विद्यालय शिवण येथे आयोजित सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद तायडे सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब बोचरे सर,फुके सर, खांडेकर सर, ठाकरे सर, बाळासाहेब दंवडे, वानखडे सर, जावाई निखिल पाटील खाडे, सौ. अश्विनी पाटील, यांच्या सह आशिष सरोदे,प्रमोद मेहरे, हरमकर सर, खोले मॅडम, कराळे मॅडम चव्हाण मॅडम, शोभा ढोरे मॅडम व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी चंदू सरोदे यांच्या दिलेल्या सेवा काळातील अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. यामध्ये त्यांचे काळात शाळेला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यामध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. अशा विद्यार्थी प्रिय, शिस्तबद्ध वागणूक असलेल्या चंदू सरोदे यांच्या सेवानिवृत्ती मुळे शाळेला उणीव भासणार असली तरी सेवानिवृत्ती नंतरच्या काळासाठी शुभकामना यावेळी देण्यात आल्या.आयोजीत कार्यक्रम दरम्यान चंद्रप्रकाश सरोदे यांचा भव्य असा सपत्नीक शाल श्री फळ साळीचोळी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे सर यांनी केले.