शिवप्रेमींच्या मागणीची दखल,तेल्हारा शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार., तेल्हारा नगरपरिषदेला शिवसृष्टीसाठी एक कोटी निधी.
शिवप्रेमींच्या मागणीची दखल,तेल्हारा शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार., तेल्हारा नगरपरिषदेला शिवसृष्टीसाठी एक कोटी निधी.
शिवप्रेमींच्या मागणीची दखल,तेल्हारा शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार., तेल्हारा नगरपरिषदेला शिवसृष्टीसाठी एक कोटी निधी.

तेल्हारा शहरासह तालुक्यातील शिव प्रेमींची शिवसृष्टी विकास व अश्र्वारूढ श्रींचा पुतळा मुख्य चौकात असावा अशी मागणी बऱ्याच वर्षापासून होती त्या मागणीची दखल घेतली गेली असून तेल्हारा नगरपरिषदेला शिवसृष्टी उभारणीसाठी तब्बल एक कोटी रुपया पर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ शिवसृष्टी व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे यामुळे शिवप्रेमींची अनेक वर्षांची मागणी मंजूर झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.
तेल्हारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसृष्टी उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमी नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर या मागणीला यश मिळाले असून शासनाने अनुदान मंजूर केल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रस्तावित शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणारी आकर्षक रचना, परिसर सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी स्थळ विकसित करण्याचा मानस नगर परिषदचा आहे. विशेष म्हणजे उभारण्यात येणारा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शहराच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे यामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाकडून या कामाची लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार असून तांत्रिक मंजुरी, आराखडा आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती दिली जाणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची भूमिका व्यक्त केली आहे. दरम्यान, अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने शिवप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरात शिवसृष्टी उभारणीमुळे नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी सह नगरसेवकांकडून ढोलताशांच्या गजरात शिव पूजन –
तेल्हारा नगर परिषदेला शिवसृष्टी करिता एक कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त झाल्यामुळे नगरपालिकेच्या अध्यक्षा वैशाली जितेंद्र पालिवाल, उपाध्यक्ष सचिन तायडे, मुख्याधिकारी सतीश गावंडे, व नगरसेवकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व शिव पूजन करून ढोल ताशांच्या गजरात उत्साह व्यक्त केला.