आपला जिल्हा

चि.अमित जोशी जन्मदिनी वृद्धाश्रमातील वृद्धांना कंबल वाटप.

श्री नाथ वृद्धाश्रम दहीगाव येथे वृद्धांचे आशिर्वाद घेऊन केला वाढदिवस साजरा.

चि.अमित जोशी जन्मदिनी वृद्धाश्रमातील वृद्धांना कंबल वाटप.
श्री नाथ वृद्धाश्रम दहीगाव येथे वृद्धांचे आशिर्वाद घेऊन केला वाढदिवस साजरा.

तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील श्री नाथ वृद्धाश्रम येथे चि. अमित अनिल जोशी याचे जन्मदिनी वृद्ध महिला पुरुष नागरिकांना कंबल वाटप करण्यात येवून त्यांचे आशिर्वाद घेऊन प्रेमाच्या उबेत आपला वाढदिवस साजरा केला.

तेल्हारा शहरातील पत्रकार अनिल जोशी यांचे चिरंजीव अमित जोशी याचे वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील रहिवासी स्त्री पुरुष यांचे आशिर्वाद घेऊन साजरा केला.श्रीनाथ वृद्धाश्रमातील रहिवाशांनी प्रेमपूर्वक आणि आदरभावाने पत्रकार अनिल जोशी यांचे चिरंजीव अमित याचे जन्मदिन दिलेले कंबल स्विकारले व चिमुकल्या ने दिलेली प्रेमाची उब आयुष्यातील चढ उताराच्या उतार वयाच्या संघर्षात ही कंबल उब मोठी कामाची येणार असल्याचे बोलून दाखवले. या उपक्रमाचे आयोजन जोशी परिवाराचे वतीने करण्यात आले होते. चि. अमित च्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धांचा आशिर्वाद घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.

वृद्धाश्रमातील व्यक्तींना कंबल वाटप प्रसंगी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे सुरेशराव शिंगणारे, अनंतराव अहेरकर, सत्यशील प्र. सावरकर, सदानंद खारोडे, विशाल नांदोकार, राहूल मिटकरी,सह जोशी कुटूंबीय मोहन जेठमल जोशी, सौ. छाया मोहन जोशी, उमेश जेटमल जोशी, सौ. ज्योती उमेश जोशी, अनिल जेठमन जोशी, सौ संगीता अनिल जोशी,भरत जेठमल जोशी, जयेश उमेश जोशी,अमित अनिल जोशी, नटवर गोपीकिसन जोशी, सौ प्रणाली नटवर जोशी, सौ मोना सुरेश बासू, मनीष सुरेश बासू, जितेंद्रप्रसाद बाबूलालजी छांगाणी, दीपक दास वैष्णव, माही नटवर जोशी, नाहीरी ओझा उपस्थित होते. श्री नाथ वृद्धाश्रम चे भाऊसाहेब धरमकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी दहिगाव श्री नाथ वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!