साखरखेर्डा येथील श्रीपलसिद्ध धर्मपीठ 1008 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांची भर पावसात जागृती.
वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती अभियानाला तेल्हारा येथे प्रतिसाद.
साखरखेर्डा येथील श्रीपलसिद्ध धर्मपीठ 1008 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांची भर पावसात जागृती.
वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती अभियानाला तेल्हारा येथे प्रतिसाद.

तेल्हारा शहरात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती अभियान समाजबांधवांचे उपस्थितीत राबवण्यात आले.यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील श्रीपलसिद्ध धर्मपीठ 1008 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शन लाभले.
तेल्हारा शहरासह तालुक्यातील बेलखेड, अडगाव सारख्या गावात वीरशैव समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. तेल्हारा शहरातील वीरशैव लिंगायत बांधवांच्या घरी जाऊन बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील श्रीपलसिद्ध धर्मपीठ 1008 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी धर्मप्रचार व प्रबोधन केले. या अभियानाला लिंग धारण विभूतीचे महत्त्व, गुरु दीक्षा, वर्षातून एकदा गुरुला भेटण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्याआले.

सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी स्वतः एकाच दिवशी भर पावसात शहरातील अनेक घरांना भेटी देऊन धर्मप्रचार केला. यावेळी त्यांनी गुरुमाऊली महाराष्ट्रातील प्रत्येक लिंगात बांधवांच्या घरी जाऊन धर्म जागृतीचे महत्त्व सांगितले. तेल्हारा शहरातील योगेश बिडवे, सुमित गंभीरे, संदीप मिटकरी, गौरव धुळे, विनायक मुंजाडे, शुभम पिंपळकर, सिद्धेश्वर घोडेस्वार, कैलास बोडके, शिवप्रसाद घोडेस्वार, प्रशांत धोंडेवार, गजानन गुळवे, संजय गंभीरे, उल्हास बिडवे, राहुल मिटकरी यांनी या कामी पुढाकार घेतला. या अभियानाला समस्त लिंगायत वीरशैव समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. धर्म जागृतीसाठी अशा प्रकारचे आयोजन भविष्यात सुरू राहणार असल्याचे समाजाचे वतीने संदीप मिटकरी यांनी सांगितले आहे.