तेल्हारा तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी गजानन किसनराव वानखडे तर तेल्हारा शहर ब्लॉक अध्यक्षपदी ॲड. संदीप देशमुख यांची नियुक्ती.
क्राॅग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी केले स्वागत.
तेल्हारा तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी गजानन किसनराव वानखडे तर तेल्हारा शहर ब्लॉक अध्यक्षपदी ॲड. संदीप देशमुख यांची नियुक्ती.
क्राॅग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी केले स्वागत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेशावरून प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी गजानन किसनराव वानखडे यांची अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष तर तेल्हारा शहर ब्लॉक अध्यक्षपदी ॲड. संदीप ओमप्रकाश देशमुख यांची पत्र देऊन नियुक्ती केली.
गजानन वानखडे हे सेवा सहकारी सोसायटी खंडाळाचे अध्यक्ष असून त्यांनी शेतामध्ये निरनिराळे प्रयोग केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने “उद्यान पंडित” या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
ॲड संदीप देशमुख हे वकील असून वकील संघ तेल्हाराचे ते माजी सचिव आहेत. ते तेल्हारा जुणे शहरातील श्री शिवाजी मंडळाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात,त्यामुळे त्यांच्या नियुक्तीने तेल्हारा शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद व्यक्त होत आहे.
दोघेही आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल, डॉ अभय पाटील, आमदार साजिद खान पठाण, वरिष्ठ उपाध्यक्ष महेश गणगणे,महिला नेतृत्व प्रदेश उपाध्यक्षा डॉ संजीवनीताई अशोकराव बिहाडे,माजी तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे, संजय आठवले, संजय बोडखे, प्रशांत पाचडे यांना देतात.
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जमीर उल्ला खा पठाण, सुरेशराव गिऱ्हे, श्यामशील भोपळे, अशोक घाटे, गजानन मुंगसे, डॉ. शकील अली मिर साहेब,माजी तालुका अध्यक्ष प्रशांत देशमुख, विजय बलोदे, मुरलि तिंवर,माजी शहर अध्यक्ष सोनु मलिये,माजी पंचायत समिती सभापती अतुल ढोले, अन्सार पटेल, कलीम अली मिरसाहेब, अनंतराव सोनमाळे, शफाकत बेग मिर्झा, अब्दुल फरीद, मयूर नेमकर, मंगेश दुतोंडे,फिरोज खान पठाण, प्रकाश राऊत, सतीश इंगळे, राहुल गिऱ्हे, देविदास चाफे, मिलिंद नितोने, मनीष भुडके, अमोल हनुमंते, मनोज राठी तसेच तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व कार्यकर्ते यांनी याबाबत शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.