आपला जिल्हा

तेल्हारा येथे महेश नवमी उत्साहाने साजरी.

भव्य शोभायात्रेत विविध झांकी.

तेल्हारा येथे महेश नवमी उत्साहाने साजरी.
भव्य शोभायात्रेत विविध झांकी.

सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती पर्व दिवस म्हणून महेश नवमी महोत्सव तेल्हारा शहरात माहेश्वरी भवन येथे भव्य शोभायात्रेसह साजरा करण्यात आला.
तेल्हारा येथील माहेश्वरी भवनात भगवान महेश नवमी निमित्त (शिवशंकर पार्वती) यांच्या प्रतिमेची ३ मान्यवर दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. माहेश्वरी भवन तेल्हारा येथून वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने माहेश्वरी बंधू भगिनी सहभागी झाले होते.
शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती. शोभायात्रेत तरुण तरूणींची उपस्थिती व प्रगटलेला उत्साह लक्षवेधी होता. भगवान शिव-पार्वती वंशोत्पत्ती पर्व प्रतिमा सजविलेल्या ट्रॅक्टरवर सुशोभित करण्यात आली होती. तर दुसऱ्या सजविलेल्या ट्रॅक्टरवर राधा बागाणी शिवजींच्या वेशभूषेत तर अमृता मोहित चांडक पार्वतीजींच्या वेशभूषेतील झाँकीने तेल्हारावासियांचे लक्ष वेधले होते. सेवाभावी नागरिकांनी ठीक ठिकाणी जलपानाची व्यवस्था केली होती.

तेल्हारा शहर माहेश्वरी समाज पदाधिकारी

महेश नवमी निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन –
दिनांक 1 जून ते महेश नवमी पर्यंतच्या पर्वात विविध स्पर्धा कार्यक्रमात चेस, कॅरम, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन, रनिंग, गीत गायन नृत्य, एकल व सामूहिक नृत्य असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यासाठीचे बक्षीस वितरणाचे प्रथम पारितोषिक डॉ. आशिष तापडिया यांच्या तर्फे तर द्वितीय बक्षीस महिला मंडळ तेल्हारा यांच्या तर्फे देण्यात आले. यावेळी पहेलगाम हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रवी चांडक, सचिव सागर लोहिया, नीरज फाफट, प्रतीक चांडक, नेहा फाफट, पूजा चांडक, राधा बागानी, दुर्गा भट्टड, सरोज तापडिया, पूर्वक मंत्री कृष्णा राठी, महेंक मल्ल, कोमल भैय्या, माहेश्वरी मंडळ अध्यक्ष अध्यक्ष ऍड.मनोज राठी, हरीश टावरी, विष्णू मल्ल, प्रा.मोहन गांधी, प्राचार्य गोपाल फापट, अमित राठी, महेश राठी, बन्सीलालजी राठी, गिरीश मंत्री, नटवर डांगरा यांच्या सह समस्त महेश्वरी समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!