तेल्हारा शहरासह तालुक्यात ईद-ऊल-अजहा ( बकरी ईद ) मोठ्या उत्साहात साजरी.
ठिक ठिकाणी सामुहीक नमाज पठण.
तेल्हारा शहरासह तालुक्यात ईद-ऊल-अजहा ( बकरी ईद ) मोठ्या उत्साहात साजरी.
ठिक ठिकाणी सामुहीक नमाज पठण.

तेल्हारा शहरासह तालुक्यातील बेलखेड, हिवरखेड, आडगाव, माळेगाव बाजार,दानापूर, तळेगावला बाजार,इसापूर इत्यादी लहान मोठ्या गावात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी ईदगाह वर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली.
सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मज्जीत मधील मौलाना यांनी नमाजाचे पठन केले. या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली. समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा, यासाठी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली .

तेल्हारा शहरात बकरी ईद साजरी –
तेल्हारा शहरासह तालुक्यात ईद-उल-अजहा ( बकरी ईद ) मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. कुर्बाणी केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे, तर त्याग, निष्ठा, आणि ईश्वरी प्रेमाचं अत्युच्च प्रतीक आहे.
कुर्बानीचं खरे तत्त्वज्ञान हेच शिकवतो की — रबच्या प्रेमासाठी आपल्या लोभाचा, गर्वाचा आणि हव्यासाचा त्याग करावा. बकरी ईद हा सण त्यागाचा आहे. स्थानिक जामा मस्जिद येथे सकाळी ८.०० वाजता हाफिज जुबेर अहेमद खान यांनी ईद-उल-अजहा ( बकरी ईद ) ची विशेष नमाज पठण करून खुतबा दिला. तसेच त्यांनी समाज बांधव यांना कुर्बाणी चे महत्व पटवून दिले. ईद ची विशेष नमाज अदा केल्या नंतर हाफिज जुबेर अहेमद यांनी देशात एकता आणि बंधुता करिता प्रार्थना ( दुआ) केली. त्यानंतर उपस्थित समाज बांधव यांनी एकमेकांना गळा भेट करून ईद च्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मौलवी मोहम्मद अजीम, हाफिज शोहरत खान, शेख आबीद साहेब, हाजी आलम खा, हाजी गुलाम रसूल, हाजी इस्माईल बेग मिर्झा, हाजी शेख नजीर, शेख युसुफ, शेख लतिफ,शेख ताजुद्दीन, इत्यादी समस्त मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तेल्हारा पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.
बेलखेड येथे मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना