आपला जिल्हा

मनुष्यबळ १० हून अधिक.

खासगी आस्थापनेत तक्रार समिती बंधनकारक

मनुष्यबळ १० हून अधिक.
खासगी आस्थापनेत तक्रार समिती बंधनकारक

अकोला, दि. १६ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियमानुसार १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कार्यालये, कारखाने, दुकाने, कोचिंग क्लासेस अशा आस्थापनांमध्ये तकार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

एखाद्या कारखाना, कोचिंग क्लासेस, मॉल, दुकानमालकाने अंतर्गत तकार समिती स्थापन न केल्यास किंवा विविध तरतुदींचे व जबाबदा-यांचे पालन न केल्यास मालकाला ५० हजार रूपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.
हाच प्रकार पुन्हा केल्यास अर्थात दुस-या गुन्ह्यात आस्थापनेचा परवाना रद्द आणि दुप्पट दंड करण्यात येणार आहे. खासगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी कंपनी, मॉल, शैक्षणिक संस्था, कोचींग क्लासेस, दुकाने, बँक, खासगी उपक्रम, संस्था, एंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक करमणुक, औद्योगीक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रूग्णालये, शुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले तसेच इतर खासगी आस्थापना आदी ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
अशी समिती स्थापन केल्याची माहिती ही केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या https://shebox.wed.gov.in या संकेतस्थळावर माहिती नोंदविता येईल. सर्व खासगी आस्थापनांनी समिती स्थापन करून त्या बाबतची नोंद संकेतस्थळावर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!