महाराष्ट्र

धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य शिव कथाकार विजयराव देशमुख अनंतात विलीन.

धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य शिव कथाकार विजयराव देशमुख अनंतात विलीन.

धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य शिव कथाकार विजयराव देशमुख अनंतात विलीन.

नागपूर, १२ फेब्रुवारी-धर्मभास्कर सद्‌गुरुदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अन्त्यसंस्कार करण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्यांचे विवेका रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. गुरू मंदिर परिवारावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव त्यांच्या जयप्रकाशनगरातील गुरू मंदिर निवासस्थानी दर्शनार्थ ठेवण्यात आले. नागपूर, विदर्भ व महाराष्ट्रातील अनेकांनी त्यांच्या जयप्रकाशनगरातील निवासस्थानी धाव घेतली.

गुरुवारी सकाळपासून अन्त्यदर्शनासाठी रीघ लागली होती. राष्ट्र सेविका समितीच्या अ. भा. सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, करुणा साठे, रा. स्व. संघाचे प्रचारक खींद्र भुसारी, विदर्भ प्रांत सह प्रचारक परीक्षित जावडे, श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष व प्रख्यात होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, रा. स्व. संघाचे धरमपेठ भाग संघचालक श्याम पत्तरकिने, दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी, माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, कल्याणी देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अनंत महाजन, हनुमंत महाजन, राजे मुधोजी भोसले, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. स्वानंद पुंड, श्रीराम महाराज जोशी, दिलीप रोडी, मुकुंद पेशकार, धनंजय कारखानीस, मीरा आणि अरविंद कडबे, डॉ. वि. स. जोग यांनी अन्त्यदर्शन घेतले.

बासर, विदर्भातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा- भांबेरी-गाडेगाव,अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आदी केंद्रांचे उपासक सातत्याने येत होते व मंदिरात महाराजांच्या पार्थिवाचे दर्शन घेत होते. त्यानंतर दुपारी उपस्थित हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना व उपासना केली. महाराजांचे पार्थिव मंदिरातून तळमजल्यावर आणण्यात आले. त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी महाराजांना डोळे भरून पाहण्यासाठी गर्दी केली. दुपारी निघालेल्या अन्त्ययात्रेत प्रत्येक जण पायी सहभागी झाला.

ज्या रस्त्यांवरून अन्त्ययात्रा मार्गक्रमण करणार होती, त्या रस्त्यांवर रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली होती. फुलांनी सजविलेला छत्र, चामर व भगवा ध्वज असलेला रथ तयार होता. त्यावर महाराजांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर मंदिरापासून अन्त्ययात्रा प्रारंभ झाली. त्यावेळी संपूर्ण मार्गावर महिला, पुरुष भाविक दुतर्फा उभे होते. प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे होती. सहकारनगर घाटावर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पुत्र अजेय देशमुख यांनी मंत्राग्नी दिला. अन्त्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सद्‌गुरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख प्रशांत दाणी, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, सोमलवाडा भाग संघचालक श्रीकांत चितळे, सोमलवाडा नगर संघचालक अविनाश भुमराळकर, अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांत कापरे, दक्षिणामूर्ती नगर संघचालक दिनेश वंडलकर, डॉ. स्वानंद पुंड, अतुल गुरू, दत्ता शिर्के, संजय बंगाले, श्री गुरू मंदिर परिवारातर्फे अरुण कडबे, प्रा. भालचंद्र देशकर, प्रसन्न बारलिंगे, गीता परिवारातर्फे श्रीनिवास वर्णेकर, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित आदी मान्यवरांनी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!